Paris Olympics Google Doodle | Photo Credit- Google)

पॅरिस ऑलिम्पिक 2024 रविवारी (27 जुलै) अधिकृतपणे सुरुवात झाली. या स्पर्धेकडे अवघ्या जगाचे ललक्ष लागले आहे. अशा वेळी जगातील सर्वात मोठे सर्च इंजिन असलेले गूगल सुद्धा खास डूडल शेअर करत या स्पर्धेचा उत्साह साजरा करत आहे. आजचे विशेष ॲनिमेटेड गूगल डूडल फ्रान्सच्या राजधानीतील खेळांसाठी नियोजित फुटबॉल स्पर्धांवर प्रकाश टाकते. डूडलमध्ये कोंबडीचे एक विचित्र ॲनिमेशन आहे जे एवोकॅडोसह हेडरचा प्रयत्न करत आहे. खेळकरपणे फुटबॉलचे प्रतिनिधित्व करत आहे, तर दुसरी कोंबडी त्याच्या वळणाची आतुरतेने वाट पाहत आहे.

फुटबॉल स्पर्धेत पुरुष आणि महिलांचा संघांचा समावेश

पॅरिस ऑलिम्पिकमधील फुटबॉल स्पर्धांमध्ये पुरुष आणि महिला या दोघांच्या स्पर्धांचा समावेश आहे, ज्यामध्ये फ्रान्स, जपान, अमेरिका आणि स्पेन यांसारखे अनेक देश विजयासाठी प्रयत्नशील आहेत. साधारण 200 हून अधिक देशांतील खेळाडू पॅरिसमध्ये 32 क्रीडा शाखांमधील 329 स्पर्धांमध्ये भाग घेण्यासाठी जमले आहेत. पॅरिस ऑलिंपिक 2024, या चतुर्मासिक स्पर्धची 33 वी आवृत्ती म्हणून ओळखळी जाते. जी 26 जुलै (स्थानिक तारकेनुसार) रोजी सुरू झाली आणि 11 ऑगस्टपर्यंत चालेल. (हेही वाचा, Paris Olympics 2024: पॅरिस ऑलिंपिक स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर गुगलने खास Google Doodle शेअर करत साजरा केला Skateboarding Events)

भारताचा संघ दाखल

उद्घाटन समारंभासाठी भारताकडून ध्वजवाहक पीव्ही सिंधू, एक स्टार शटलर आणि टेबल टेनिस स्टार शरथ कमल यांच्या नेतृत्वाखाली भारतीय तुकडी काल पॅरिसमध्ये दाखल झाली. या सर्व तुकडीसाठी तरुण ताहिलियानी यांनी भारतीय संघासाठी यंदाचे कपडे डिझाइन केले आहेत. (हेही वाचा, Olympic Games Paris 2024 Google Doodle: ऑलिंपिक्स ची आज पासून सुरूवात; Google ने साकारलं खास डूडल!)

2024 पॅरिस समर गेम्समध्ये भारतीय स्पर्धक

शूटिंग: पृथ्वीराज तोंडैमन, संदीप सिंग, स्वप्नील कुसाळे, ऐश्वरी प्रताप सिंग तोमर, इलावेनिल वालारिवन, सिफ्ट कौर समरा, राजेश्वरी कुमारी, सरबजोत सिंग, अर्जुन बबुता, रमिता जिंदाल, मनू भाकेर, अनिश भानवाला, अंजुम मुदगे, अनीश भानवाला , ईशा सिंग , रिदम सांगवान , विजयवीर सिद्धू , रैझा ढिल्लोन , अनंतजीत सिंग नारुका , श्रेयसी सिंग , माहेश्वरी चौहान

ॲथलेटिक्स: अक्षदीप सिंग, प्रियांका गोस्वामी, विकास सिंग, परमजीत बिश्त, अविनाश साबळे, नीरज चोप्रा, पारुल चौधरी, राम बाबू, प्रियांका गोस्वामी/सूरज पनवार, मोहम्मद अनस/मुहम्मद अजमल/अमोज जेकब/संतोज तामिळराज तामिळराज , ज्योतिका श्री दांडी/सुभा वेंकटेशन/विथ्या रामराज/पूवम्मा एमआर, किरण पहल, ज्योती याराजी, सर्वेश कुशारे, अन्नू राणी, तजिंदरपाल सिंग तूर, अब्दुल्ला अबोबकर, प्रवील चित्रवेल, जेस्विन आल्ड्रिन, अंकिता ध्यानी.

टेबल टेनिस: शरथ कमल, हरमीत देसाई, मानव ठक्कर, मनिका बत्रा, श्रीजा अकुला, अर्चना कामथ

टेनिस: रोहन बोपण्णा/एन श्रीराम बालाजी

रोइंग: बलराज पनवार

बॅडमिंटन: पीव्ही सिंधू, एचएस प्रणॉय, लक्ष्य सेन, सात्विकसाईराज रँकीरेड्डी/चिराग शेट्टी, अश्विनी पोनप्पा/तनिषा क्रास्टो

गोल्फ: शुभंकर शर्मा, गगनजीत भुल्लर, अदिती अशोक, दीक्षा डागर

वेटलिफ्टिंग: मीराबाई चानू

जुडो: तुलिका मान

पोहणे: श्रीहरी नटराज, धिनिधी देशिंगू

दरम्यान, पुढील आठवड्यांमध्ये, जगभरातील खेळाडू ट्रॅक आणि फील्ड, पोहणे, बास्केटबॉल आणि जिम्नॅस्टिक्स यासारख्या विविध स्पर्धांमध्ये भाग घेतील.