Olympic Hockey Qualifier: भारतीय महिला आणि पुरुष हॉकी संघाचा शानदार विजय, ऑलिंपिक पात्रतेपासून अवघे एक पाऊल
भारतीय पुरुष आणि महिला हॉकी संघ (Photo Credit: Twitter)

शुक्रवारी भारतीय महिला (India Women's Hockey Team) आणि पुरुष हॉकी संघां (Men's Hockey Team) ने ऑलिम्पिक पात्रता गटातील पहिल्या सामन्यात शानदार विजय नोंदविला. भारतीय महिला संघाने अमेरिकेला (USA) 5-1 असे पराभूत केले तर पुरुष संघाने रशियाला (Russia) 4-2 असा विजय मिळवला. या विजयासह दोन्ही संघ ऑलिम्पिकची (Olympic) पात्रता मिळवण्यापासून काही पाऊल दूर आहे. आज, शनिवारी दोन्ही संघ आपला दुसरा क्वालिफायर सामना खेळणार आहेत. ओडिशाच्या कलिंग स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात भारतीय संघाने अमेरिकेला 5-1 ने पराभूत केले.भारतीय संघाने महिला सामन्यात एकतर्फी वर्चस्व राखले. दोन्ही संघामध्ये संघर्षपूर्ण मॅच पाहायला मिळाली. पहिल्या मिनिटापासून भारताने अटॅकिंग हॉकी खेळण्याचा प्रयत्न केला, ज्यावर अमेरिकेने चांगला प्रतिसाद दिला. अमेरिकेचा संघ भारताच्या डिफेन्समध्ये घुसखोरी करण्यात यशस्वी झाला नाही. भारताच्या या एकतर्फी सामन्यात चार वेगवेगळ्या खेळाडूंनी गोल केले. भारताकडून गुरजित कौर (Gurjeet Kaur) ने दोन तर लिलिमा मिंज, शर्मिला देवी आणि नवनीत कौर यांनी प्रत्येकी एक गोल केला.

पहिला क्वार्टर गोलरहित संपला. दुसर्‍या क्वार्टरमधेही अमेरिकेने आपली लय कायम ठेवली आणि बॉलची अधिक जागा राखली. पण, भारतीय संघ पेनल्टी कॉर्नर मिळविण्यात यशस्वी झाला. भारताकडून लिलिमा मिंज (28 व्या मिनिटाला), शर्मिला देवी (40 व्या मिनिटाला), गुरजित कौर (42 व्या मिनिटाला), नवनीत कौर (46 व्या मिनिटाला) आणि पाचवा गोल गुरजित कौरने 51 व्या मिनिटाला गोल केला. दुसरीकडे, पुरुषांसमोर पाचव्या क्रमांकाचा भारतीय संघासमोर रशियाचा कमकुवत संघ होता. पहिल्या ऑलिम्पिक पात्रता सामन्यात रशियाला 4-2 ने पराभूत केले.

या सामन्यात विजयासाठी बलवान भारतीय संघाला संघर्ष करावा लागला नाही. मनदीप सिंगच्या 2 गोलच्या मदतीने भारताने रशियाला हरवले. मनदीपने 24 व्या आणि 53 व्या मिनिटाला गोल करुन संघाला विजय मिळवून दिला. मात्र, भारतासाठी खाते उघडण्याचे काम हरमनप्रीत सिंगने केले. हरमनप्रीतने 5 व्या मिनिटाला गोल करून भारताला आघाडी मिळवून दिली. सामन्याच्या शेवटच्या क्षणी गोल करत रशियाने पराभवाचा फरक कमी केला आणि अखेरीस भारताने सामना 4-2 ने जिंकला.