केनियाचा Olympic चॅम्पियन Eliud Kipchoge दोन तासांत मॅरेथॉन पूर्ण करणारा पहिला अ‍ॅथलीट, पहा व्हिडिओ
Eliud Kipchoge (Photo Credit: IANS)

मॅरेथॉन जागतिक रेकॉर्ड धारक आणि केनियाचा अ‍ॅथलीट एलिउड किपचोगे (Eliud Kipchoge) खेळाच्या इतिहासात अमर झाला आहे. दोन तासांपेक्षा कमी वेळात मॅरेथॉन पूर्ण करणारा किपचॅगे जगातील पहिलाअ‍ॅथलीट बनला आहे. 1 तास 59 मिनिट 40.2 सेकंदाच्या अनधिकृत वेळेसह, ऑलिम्पिक चॅम्पियन प्रॅटर पार्कमध्ये दोन तासांपेक्षा कमी वेळेत मॅरेथॉन धावणारा पहिलाच खेळाडू ठरला. किपचोगेचा हा रेकॉर्ड आता अमर झाला आहे. आणि हा रेकॉर्ड मोडणे जवळजवळ कठीण आहे. यापूर्वी 34-वर्षीय या धावपटूने16 सप्टेंबर 2018 रोजी फ्लॅट बर्लिन (Berlin) मॅरेथॉनमध्ये दोन तास 01 मिनिट 39 सेकंदाच्या अंतरासह पुरुषांच्या अंतरावर पुरुष विक्रम नोंदविला आहे. साधारणत: 2:50 मिनिटे प्रति किलोमीटर वेगाने वेगवान कामगिरी करत त्याने नेहमीचे जेस्चर आणि हसत-हसत फिनिश लाइन पार केली.

शनिवारी व्हिएन्ना प्रॅटर पार्कच्या उत्तरार्धात 21.3 किलोमीटरचे अंतर पूर्ण करुन किपचोगेने विक्रम मोडण्याचे लक्ष्य ठेवले होते. दरम्यान, या यशस्वी कामगिरीनंतरही किपचोगेचा हा रेकॉर्ड, जागतिक विक्रम म्हणून मोजला जाणार नाही. अधिकृतपणे मंजूर होण्याच्या प्रयत्नासाठी आयनीएएफने आयएएएफकडे विनंतीसुद्धा सादर केली नाही. शर्यती दरम्यान, किपचोजेला एका गाडीने फॉलो केले आणि 30 पेसमेकरच्या सैन्याने त्यांना सहाय्यदेखील केले.