नीरज चोप्राने रविवारी बुडापेस्ट येथील जागतिक अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक पटकावले. भारतीयांसाठी हा एक आनंदाचा क्षण होता. त्यामुळे सहाजिकच त्याचे चाहत्यांमध्ये अधिकच उत्साह संचारला. या वेळी हंगेरियन महिलेने नीरजकडे ऑटोग्राफ मागितला. पण, तिला भारतीय ध्वजावर ऑटोग्राफ हवा होता. निरजने राष्ट्रध्वजावर ऑटोग्राफ करण्यास नकार दिला. मात्र त्याने महिलेच्या शर्टच्या बाहीवर मात्र ऑटोग्राफ दिला. ज्यामुळे ती खुष झाली. त्याने भारतीय तिरंग्याबद्दल आदरही दाखवला आणि महिलेचे मनही राखले. या प्रसंगाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. राष्ट्रध्वजाप्रती दाखविलेल्या आदराबद्दल त्याचे कौतुक केले जात आहे. आपणही हा व्हिडिओ पाहू शकता.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)