राष्ट्रपति रामनाथ कोविंद पुरस्कार प्रदान करताना (Photo Credits: ANI)

गुरुवारी राष्ट्रीय क्रीडा दिना निमित्त (National Sports Day) राष्ट्रपती रामनाथ कोविंद (Ram Nath Kovind) यांच्या हस्ते, क्रीडा क्षेत्रातील व्यक्तींचा सन्मान करण्यात आला. राष्ट्रपती भवनात या पुरस्कार सोहळा पार पडला. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते क्रीडा क्षेत्रातील एकूण 32 व्यक्तींना पुरस्कारांनी गौरविण्यात आले. यातील बहुतेक खेळाडूंना त्यांचा पुरस्कार स्वत: राष्ट्रपती कोविंद यांच्या हस्ते मिळाला. काही खेळाडू या पुरस्कार सोहळ्यासाठी उपस्थित राहू शकले नाहीत, त्यांना नंतर हे पुरस्कार प्रदान करण्यात येतील.

या 32 पुरस्कारांपैकी दोन खेळाडू (दीपा मलिक आणि बजरंग पुनिया) यांना खेलरत्न, 6 द्रोणाचार्य पुरस्कार (3 नियमित प्रशिक्षक आणि 3 लाइफटाइम अचिव्हमेंट), 5 ध्यानचंद लाइफ टाइम अचिव्हमेंट पुरस्कार आणि 19 खेळाडूंना अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. खेलरत्न जिंकणारा बजरंप पूनिया आणि अर्जुन पुरस्कार जिंकणारा रवींद्र जडेजा या समारंभास उपस्थित राहू शकला नाही. खेल रत्न मिळविणारी दीपा मलिक ही पहिली महिला पॅरा-एथलिट ठरली आहे.

(हेही वाचा: National Sports Day 2019: 'राष्ट्रीय क्रीडा दिना' निमित्त जाणून घ्या 'Hockey Wizard' मेजर ध्यानचंद आणि जर्मन हुकूमशहा हिटलर यांच्यातील मजेदार किस्सा)

पुरस्कार मिळालेल्या खेळाडूंची यादी –

राजीव गांधी खेल रत्न

बजरंग पुनिया (कुस्ती)

दीपा मलिक (पॅरा अ‍ॅथलीट)

द्रोणाचार्य पुरस्कार

विमल कुमार (बॅडमिंटन)

संदीप गुप्ता (टेबल टेनिस)

मोहिंदर सिंह ढिल्लों (अ‍ॅथलेटिक्स)

द्रोणाचार्य लाइफटाइम अचिव्हमेंट –

मर्जबान पटेल (हॉकी)

रामबीरसिंग खोखर (कबड्डी)

संजय भारद्वाज (क्रिकेट)

अर्जुन पुरस्कार -

तेजिंदर पाल सिंह तूर (अ‍ॅथलेटिक्स)

मोहम्मद अनस याहिया (अ‍ॅथलेटिक्स)

एस. भास्करन (बॉडी बिल्डिंग)

सोनिया लाथर (बॉक्सिंग)

रवींद्र जडेजा (क्रिकेट)

चिंगलेनसाना सिंह कंगुजम (हॉकी)

अजय ठाकुर (कबड्डी)

गौरव सिंह गिल (मोटर स्पो‌र्ट्स)

प्रमोद भगत, पॅरा स्पोर्ट्स (बॅडमिंटन)

अंजुम मौदगिल (शूटिंग)

हरमीत राजुल देसाई (टेबल टेनिस)

पूजा ढांडा (कुस्ती)

फवाद मिर्झा (अश्व राईडिंग)

पूनम यादव (क्रिकेट)

स्वप्ना बर्मन (अ‍ॅथलेटिक्स)

सुंदरसिंग गुर्जर, पॅरा स्पोर्ट्स (अ‍ॅथलेटिक्स)

बी. साई प्रणीत (बॅडमिंटन)

सिमरनसिंग शेरगिल (पोलो)

ध्यानचंद पुरस्कार- 

मॅन्युएल फ्रेडरिक्स (हॉकी)

अरूप बसक (टेबल टेनिस)

मनोज कुमार (कुस्ती)

नितन कीर्तने (टेनिस)

लालरेमसानगा (तिरंदाजी)

खेल रत्न प्राप्त करणारे, दीपा मलिक आणि बजरंग पुनिया यांना प्रत्येकी साडेसात लाख, पदक आणि सन्मानचिन्ह देण्यात आले. अर्जुन, द्रोणाचार्य आणि ध्यानचंद पुरस्कार प्राप्त खेळाडूंना 5 लाख रुपयांनी सन्मानित करण्यात आले. 17 ऑगस्ट रोजी राजधानी दिल्ली येथे झालेल्या बैठकीत 12  सदस्यांच्या समितीने या विविध पुरस्कारांसाठी विविध खेळाडूंच्या नावांची शिफारस केली होती.