Mumbai Shree 2019: शरीरसौष्ठव पटूंचा चित्तथरारक खेळ रंगणार, येत्या 17 फेब्रुवारी पासून 'मुंबई श्री'ला सुरुवात
मुंबई श्री (फोटो सौजन्य-फेसबुक)

Mumbai Shree 2019: मुंबई मधील अतंत्य महत्वपूर्ण आणि कौशल्यपूर्ण अशा 'मुंबई श्री' (Mumbai Shree) च्या खेळाला येत्या 17 फेब्रुवारी पासून सुरुवात होणार आहे. तर शरीरसौष्ठव पटूंचा यंदाचा खेळ हा भव्यदिव्य नव्हेच तर अनोख्या पद्धतीने प्रेक्षकांचे मन जिंकणारा असणार आहे.

लोअर परळ (Lower Parel) येथील वर्कशॉपच्या मैदानात 17-18 फेब्रुवारीला मुंबई श्री या खेळाचे आयोजन करण्यात आले आहे. तर विजेत्यांना आठ लाख रुपयांचे बक्षिस देऊ करण्यात येणार असल्याचे स्पर्धा आयोजक प्रभाकर कदम यांनी सांगितले आहे. तर या चित्तथरारक खेळ पाहण्यासाठी प्रेक्षकांची मोठ्या संख्येने गर्दी पाहायला मिळते. तसेच शरीरसौष्ठ पटूंची शरीरयष्टी सादर करण्याची पद्धत अनोखीच असते. एखाद्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेला मागे टाकेल अशी ही स्पर्धा असते.

तर दृष्ट लागण्याजोग करण्यात आलेले आयोजन आणि शरीरसौष्ठव पटूंची पीळदार शरीरयष्टी यावेळी पाहायला मिळते. तर गेल्या वर्षी 20 फेब्रुावारी 2018 रोजी पार पडलेल्या मुंबई श्रीच्या खेळात 85 किलो वजनी गटातील सुजल पिळणकर ह्याला 'मुंबई श्री'च्या पुरस्काराने गौरविण्यात आले होते.