Milkha Singh Health Update: भारताचे महान धावपटू मिल्खा सिंह (Milkha Singh) यांच्या प्रकृतीविषयी माहिती देताना PGIMER रुग्णालयाने सांगितले की शुक्रवारी त्यांची ऑक्सिजन पातळी खाली आली आणि त्यांना तापही आला पण ते बरे होण्यासाठी धडपडत आहे. बुधवारी COVID-19 चाचणी नकारात्मक आल्यावर 91-वर्षीय मिल्खा यांना सामान्य आयसीयूमध्ये हलविण्यात आले असून डॉक्टरांची टीम त्यांच्यावर तब्येतीवर बारीक नजर ठेवून आहेत. "गुरुवारी रात्री त्यांना अचानक ताप आला आणि त्यांच्या ऑक्सिजन संपृक्ततेची पातळी कमी झाली. डॉक्टरांचे एक पथक त्यांच्यावर नजर ठेवून आहेत," PGIMER च्या सूत्रांनी शुक्रवारी सांगितले. यापूर्वी मिल्खा यांची प्रकृती “स्थिर” होती. त्यांच्या कुटूंबियांच्या वक्तव्यानुसार, “मिल्खाजींसाठी हा एक कठीण दिवस होता. पण तो त्यातून झगडत आहे.”
गेल्या महिन्यात त्यांना कोविड-19 संसर्ग झाला होता. तसेच, कोविड-19 व्हायरसशी लढा देताना त्यांची पत्नी निर्मल कौर यांचे रविवारी मोहाली येथील खासगी रुग्णालयात निधन झाले. कौर पूर्वी महिला व्हॉलीबॉल संघाच्या कर्णधार होत्या. एका आठवड्यात मोहालीच्या फोर्टिस रूग्णालयात उपचारानंतर घरी ऑक्सिजनची पातळी कमी झाल्यानंतर मिल्खाला 3 जून रोजी पीजीआयएमआरमध्ये दाखल करण्यात आले होते. दिग्गज अॅथलीट चार वेळा आशियाई खेळांचे सुवर्णपदक विजेते आणि 1958 राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत आहे तथापि त्यांची 1960 च्या रोम ऑलिम्पिकमधील 400 मीटर अंतिम सामन्यात चौथ्या स्थानावरील त्यांची सर्वोत्तम कामगिरी राहिली आहे. त्यांनी 1956 आणि 1964 ऑलिम्पिकमध्ये देखील भारताचे प्रतिनिधित्व केले.
COVID-19: Sprint legend Milkha Singh battling away as family prays for best
Read @ANI Story | https://t.co/LzgH5Oj79I pic.twitter.com/AsXn8ukzND
— ANI Digital (@ani_digital) June 18, 2021
1959 मध्ये त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.