PC-X

भारत विरुद्ध मालदीव आंतरराष्ट्रीय मैत्रीपूर्ण फुटबॉल सामन्यापूर्वी भारतीय फुटबॉल संघातूम मोठी बातमी समोर आली आहे. दुखापतीमुळे त्यांचा स्टार फॉरवर्ड Manvir Singhला संघातून बाहेर पडावे लागले आहे. संघाने "एक्स" हँडलद्वारे मनवीर सिंगने शिलाँगमधील टीम इंडिया(India Football Team)चा कॅम्प सोडल्याची माहिती दिली. तो कोलकात्याला परतणार आहे. आज शिलाँगमधील जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर संध्याकाळी 7 वाजता भारत आणि मालदीव आंतरराष्ट्रीय मैत्रीपूर्ण फुटबॉल सामना होणार होता.