लंडन ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक विजेती सायना नेहवाल (Saina Nehwal) आणि मलेशिया मास्टर्स स्पर्धेत (Malaysia Masters) भारताची आघाडीची महिला बॅडमिंटनपटू वर्ल्ड चॅम्पियन पीव्ही सिंधू (PV Sindhu) लाही पराभवाला सामोरे जावे लागले आहे. शुक्रवारी सायनाला ऑलिम्पिक चॅम्पियन स्पेनच्या कॅरोलिना मारिन (Carolina Marin) हिने स्पर्धेच्या क्वार्टर फायनल फेरीत 21-8 21-7 ने पराभूत केले. सायना आणि मारिनमधील क्वार्टल-फायनल सामना 30 मिनिटं खेळण्यात आला. या दोघांमधील हा 13 वा सामना होता. मारिन सात वेळा विजयी झाली आहे. यापूर्वी, क्वार्टर फायनलमध्ये पराभूत झाल्यानंतर जागतिक विश्वविजेती सिंधू स्पर्धेतून बाहेर पडली. सिंधूला महिला एकेरीच्या अंतिम सामन्यात चिनी तैपेईच्या ताई त्सु यिंगने (Tai Tzu Ying) पराभूत केले. गेल्या वर्षी खराब फॉर्ममधून त्रस्त असलेल्या सिंधूकडून नवीन वर्षात चांगली कामगिरी करण्याची अपेक्षा होती, मात्र यिंगने वर्षाच्या पहिल्या स्पर्धेच्या महत्त्वपूर्ण सामन्यात सिंधूला 21-16, 21-16 ने पराभूत केले. यिंगविरुद्ध सिंधूचा हा 12 वा पराभव आहे.
सिंधूला जु यिंगकडून सलग दुसर्या पराभवाला सामोरे जावे लागले. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये झालेल्या फ्रेंच ओपनच्या उपांत्यपूर्व फेरीत तिला पराभव पत्करावा लागला होता. सिंधूने माजी नंबर 1 यिंगविरुद्ध फक्त पाच वेळा विजय मिळविला आहे. आजच्या सामन्यात यिंगने सुरुवातीपासून सिंधूवर वर्चस्व कायम ठेवले होते. दमदार सुरुवात करत तिने सिंधूवर आघाडी घेतली होती, मात्र नंतर सिंधूने 7-7 ने बरोबरी केली. यानंतर यिंगने सलग चार गुण घेत स्कोर 11-7 केला. ब्रेकनंतरही यिंगने फॉर्म कायम ठेवत पहिला गेम 17 मिनिटांत जिंकला. दुसऱ्या गेममधेही यिंगने सुरुवातीला आघाडी घेतली. सिंधू या गेममध्ये संघर्ष करताना दिसली. सलग पाच मॅच पॉईंट वाचवत यिंगला परेशान केले, मात्र चिनी तैपेई खेळाडूने अखेर विजय मिळवला.
समीर वर्मा आणि एचएस प्रणय दोघेही दुसर्या फेरीत पराभूत झाल्याने पुरुष एकेरीत भारतीय आव्हान संपुष्टात आले. वर्माचा मलेशियाच्या ली झी जियाने 21-19, 22-20 असा पराभव केला, तर प्रणॉयला जपानच्या केंटो मोमोटाविरुद्ध 21-14, 21-16 ने पराभवाला सामोरे जावे लागले.