Kusti Image For Representation (Photo Credits: Instagram)

Maharashtra Kesari Kusti 2019-20: महाराष्ट्रातील तमाम पैलवानांसाठी मानाचा समजल्या जाणा-या 'महाराष्ट्र केसरी कुस्ती' स्पर्धेला 3 जानेवारीपासून सुरुवात झाली असून हा पहिल्या दिवसाअखेरीस हा खेळ आणखीनच रोमांचक बनत चालला आहे. स्पर्धेच्या पहिल्या दिवशी महाराष्ट्राच्या कानाकोप-यातून आलेल्या कुस्तीपटूंमध्ये चांगलीच चुरस पाहायला मिळाली. आज या स्पर्धेचा दुसरा दिवस आहे. पहिल्या दिवसाचा खेळ पाहता आज देखील पैलवानांमध्ये कांटे की टक्कर पाहायला मिळणार आहे असं म्हणायला हरकत नाही. या खेळाचे चाहते असलेल्यांना घरबसल्या जर हा खेळ बघायचा असेल तर त्याचे लाईव्ह स्ट्रिमिंग युट्यूब वर पाहू शकतात.

यंदाची 63 वी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा पुण्यातील बालेवाडीमध्ये आयोजित करण्यात आली आहे.

इथे पहा महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा 2019-20 दुस-या दिवसाच्या खेळाचं लाईव्ह स्ट्रिमिंग

पाहा आजच्या कुस्तीचे वेळापत्रक

शनिवार दिनांक 4 जानेवारी 2020

● सकाळी 9 ते दुपारी 12 वा कुस्ती स्पर्धा "ब" विभाग..(61,70 व 86 किलो)

●दुपारी 12 ते 1 वाजेपर्यंत- वैद्यकीय तपासणी व वजने "क" विभाग. (74,92 व महाराष्ट्र केसरी गट)

● दुपारी 4 ते सायंकाळी 7 वाजता - कुस्ती स्पर्धा "ब"व "क" विभाग . (61, 70, 74, 86, 92 व महाराष्ट्र केसरी गट किलो) हेदेखील वाचा- Maharashtra Kesari Kusti 2019-20: महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा Tickets मोफत! सामने पाहण्यासाठी जाणून घ्या शिवछत्रपती क्रीडानगरी बालेवाडी पुणे येथे कसे पोहचाल

मामासाहेब मोहोळ यांच्याकडून 1961 पासून या कुस्ती स्पर्धेची सुरुवात करण्यात आली होती . मात्र कुस्तीगीर परिषदेचे संस्थापक अध्यक्ष मामासाहेब मोहोळ यांचे 1982 साली निधन झाल्यानंतर ही परंपरा मोहोळ कुटुंबीयांनी महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेला सुपूर्द केली. गेली 36 वर्ष मोहोळ कुटुंबीयांकडून 'महाराष्ट्र केसरी' विजेत्यासाठी चांदीची गदा बनवून देण्यात येते.महाराष्ट्र केसरीच्या विजेत्याला चांदीची गदा आणि 2 लाख रुपयाचं रोख बक्षीस दिले जात असल्याने ही स्पर्धा अत्यंत चर्चेची ठरते.