ATP Ranking मध्ये लिअँडर पेस याला मोठा धक्का, 19 वर्षात प्रथमच पहिल्या 100 मधून बाहेर
लिअँडर पेस (Photo Credit: Getty Images)

भारताचा अनुभवी टेनिस स्टार लिअँडर पेस (Leander Paes) मागील 19 वर्षात पहिल्यांदा सोमवारी एटीपीच्या (ATP) दुहेरीच्या क्रमवारीत पहिल्या 100 मधून बाहेर पडला आहे. भारतीय टेनिसचे वजन बऱ्याच काळापासून खांद्यावर घेऊन जाणाऱ्या पेसने आपल्या कारकीर्दीत देशासाठी अभिमान बाळगण्यासाठी सतत संधी दिल्या आहेत. पेसची 46 वर्षांची कामगिरी पाहून विरोधी खेळाडूही त्यांचे कौतुक करण्यास भाग पाडले. पण आता त्याच्या अलीकडील कामगिरीनंतर पेसला मोठा धक्का बसला आहे. पेसला पाच स्थानाचे नुकसान झाले आहे आणि तो आता 856 गुणांसह 101 व्या क्रमांकावर पोहोचला आहे. त्याच्याआधी या क्रमवारीत आणखी तीन भारतीय खेळाडू आहेत.  रोहन बोपन्ना (Rohan Bopanna) 38 व्या, दिविज शरण (Divij Sharan) 46 आणि पुरव राजा (Purav Raja) 93 व्या स्थानावर आहेत. पुरवने आठ स्थानाची झेप घेत ही क्रमवारी मिळवली आहे.

46 वर्षीय पेस ऑक्टोबर 2000 मध्ये पहिल्यांदा पहिले 100 मधून बाहेर पडला होता. तेव्हा त्याच रँकिंग 118 व्या क्रमांकापर्यंत घसरली होती. यावर्षी सप्टेंबरमध्ये यूएस ओपनमध्ये खेळल्यानंतर 18 ग्रँड स्लॅम जेतेपद मिळवणारा पेस टेनिस कोर्टात दिसला नाही. त्याने पाकिस्तानविरुद्ध डेव्हिस कप सामन्यासाठी स्वत:ला उपलब्ध ठेवले आहेत. दरम्यान, प्रजनेश गुन्नेस्वरन (Prajnesh Gunneswaran) एकेरीत भारताचा अव्वल खेळाडू म्हणून कायम आहे. त्याची रँकिंग घसरली आहे आणि तो सध्या 95 व्या स्थानावर आहे. त्याच्यानंतर सुमित नागल 127, रामकुमार रामनाथन 190, शशी कुमार मुकुंद 250 आणि साकेत मयेनेनी 267 स्थानावर आहेत.

1990 ते 2000 च्या दरम्यान पेसने महेश भूपती याच्या सह टेनिस जगातील दुहेरी सर्किटवर राज्य केले आहेत. पेस हा भारताचा सर्वात यशस्वी टेनिसपटू आहे.