लिअँडर पेस (Photo Credit: Getty Images)

भारताचा (India) दिग्गज टेनिसपटू लिअँडर पेस (Leander Paes) याने निवृत्ती जाहीर केली आहे. 46 वर्षीय पेसने बुधवारी माहिती दिली की 2020 त्याच्या कारकीर्दीचे शेवटचे वर्ष असेल आणि यानंतर तो व्यावसायिक टेनिसमधून निवृत्ती घेईल. 1996 च्या ऑलिम्पिकमध्ये एकेरीत पदक जिंकणार्‍या पेसने सोशल मीडियावर सर्वांना आनंददायी ख्रिसमसच्या शुभेच्छा देऊन आपल्या निवृत्तीबद्दल सर्वांना माहिती दिली. आपल्या सुवर्ण कारकिर्दीतीलडबल्ससह 18 ग्रँड स्लॅम अनेक विजेतेपद मिळवणाऱ्या पेस दीर्घ काळापासून खराब फॉर्मशी झुंज देत आहेत. डेव्हिस कपच्या (Davis Cup) इतिहासातील सर्वात यशस्वी डबल्स सामना जिंकणारा पेस क्रमवारीत 19 वर्षात प्रथमच पहिल्या 100 च्या बाहेर पडला. पेसने त्याच्या चाहत्यांना त्याच्या आवडत्या आठवणी 'वन लास्ट रोअर' हॅशटॅगसह शेअर करण्यासही सांगितले.

पेसने ट्विटरवर लिहिले की, “मला हे जाहीर करायचे आहे की व्यावसायिक टेनिसपटू म्हणून 2020 हे माझे शेवटचे वर्ष असेल. त्यांनी पुढे लिहिले की, 'मी 2020 च्या टेनिस कॅलेंडरची उत्सुकता आहे ज्यामध्ये मी निवडक टूर्नामेंट खेळेल, संघासह प्रवास करेन आणि माझे मित्र आणि जगभरातील चाहत्यांसोबत उत्सव साजरा करू शकेन. तुमच्या सर्वांमुळे मी येथे पोहोचलो आहे. यावर्षी मी तुम्हा सर्वांचे आभार मानू इच्छितो.'

पेस म्हणाला, '2020 हे भावनिक वर्ष असेल आणि मी तुमच्या सर्वांच्या प्रतीक्षेत आहे. त्यांनी त्यांच्या परिवाराचे, विशेषत: बहिणी आणि मुलीचे आभार मानले आणि त्यांच्या मदतीबद्दल त्यांचे आभार मानले. शिवाय, टोकियो ऑलिम्पिक ही त्याच्या कारकीर्दीची शेवटची स्पर्धा असू शकते, असा इशाराही त्याने दिला. पेसने त्याच्या मोठ्या टेनिस कारकिर्दीत अनेक महत्वाच्या गोष्टी मिळवल्या आहेत. एकेरी स्पर्धेसह त्याने दुहेरी टेनिसमध्ये देखील अनेक स्पर्धा जिंकल्या आहेत.