खाबीब नूरमगोमेदोव (Photo Credit: FIle Image)

Khabib Nurmagomedov Could Make UFC Comeback: यूएफसी 254 मध्ये जिंकल्यानंतर खाबीब नूरमगोमेदोवच्या (Khabib Nurmagomedov) निवृत्तीची घोषणेने एमएमए (MMA) समुदायाला मोठा धक्का बसला. जस्टिन गेथजेवर विजय मिळवून आपला व्यावसायिक विक्रम 29-0 पर्यंत वाढवल्यानंतर रशियनने निवृत्तीची घोषणा केली व असे सांगितले की, आपले वडिल बाजूला नसताना त्याला लढायचे नाही. खाविबचे प्रशिक्षक आणि वडील (Khabib Nurmagomedov Father) अब्दुलमनप 57 व्या वर्षी जुलै महिन्यात कोविड संसर्गामुळे होणाऱ्या गुंतागुंतीमुळे झाले. पण, खाबीबचे प्रशिक्षक जेव्हियर मेंडेझ (Javier Mendez) यांनी खाबीबने एमएमएच्या निवृत्तीची घोषणा केल्यानंतर अंतिम वेळा युबीसीकडे परतण्याची शक्यता नाकारली नाही. फायटरकडून भावनिक निर्णय घेण्यात आला होता आणि खाबीबने आपल्या निर्णयाचा आढावा घ्यावा असे मेंडेज यांनी म्हटले आहे. त्याचे वडील अब्दुलमानपही त्याचे प्रशिक्षक होते आणि जुलैमध्ये दुर्दैवाने त्यांचे निधन झाले. (Khabib Nurmagomedov Retirement: प्रख्यात UFC LightWeight फायटर खबीब नूरमागोमेदोव ने केली सेवानिवृत्तीची घोषणा, आईला दिलेल्या वचनाचे केले पालन)

त्यानंतर खाबीबने घोषणा केली की तो शेवटचा सामना खेळेल आणि वडिलांचा सन्मान करण्याच्या हेतूने हलक्या वजनाच्या यूएफसी 254 विजेतेपदाचा बचाव करेल, पण आईला दिलेल्या वचनामुळे पेंटॅगॉनमध्ये यापुढे लढणार नसल्याचं जाहीर केलं. "माझ्या वडिलांशिवाय मी परत येणार असा कोणताही मार्ग नाही. जेव्हा यूएफसीने मला जस्टिन (गेथजे) बद्दल फोन केला, तेव्हा मी तीन दिवस माझ्या आईशी बोललो. वडिलांविना मी कसे फाईट करावे हे तिला माहित नाही, परंतु मी वचन दिले की ही माझी शेवटची फाईट असेल आणि मी माझा शब्द दिला तर मला त्याचे अनुसरण करावे लागेल,” विजयानंतर खाबीबने पत्रकारांना सांगितले.

पण खाबीबच्या ट्रेनरने पँटागॉनवर रशियन फायटरच्या परहण्याची शक्यता नाकारली नाही. "मला कल्पना नव्हती, त्याने मला कधीच काही सांगितले नाही, माझीही स्थिती इतर सर्वांसारखाच होती. पण हे, मला समजले की वडिलांचा ओढा खूप होता," खाबीबच्या प्रशिक्षकाने सनस्पोर्टने म्हटले. त्यांनी पुढे म्हटले, खाबीब, तो अत्यंत भावनिक होता आणि त्याबरोबर तो काय करतो, हे मला माहित नाही. मला माहित आहे की त्याने जे सांगितले ते बोलले, परंतु ते अत्यंत भावनिक होते आणि ते टिकेल की नाही हे वेळ सांगेल." मेंडेझ यांनी खाबीबच्या वडिलांच्या अकाली मृत्यूच्या आधीचे स्वप्न उघड केले. खाबीबच्या वडिलांचे स्वप्न होते की त्यांच्या मुलाने 30-0 असा रेकॉर्ड विजय मिळवण्याचा प्रयत्न करावा. "जर त्याच्या आईला समजले की तो फाईट करू शकतो आणि खाबीबला प्रत्यक्षात पुढे जायचे असेल तर ती जा म्हणू शकते आणि आपल्या वडिलांचा वारसा पूर्ण करेल आणि 30-0 पर्यंत जाईल," मेंडेझ म्हणाले.