Khabib Nurmagomedov | (Photo Credits: Facebook)

रशीयाचा जगप्रसिद्ध मुष्टीयोद्धा (Boxer) खबीब नूरमागोमेदोव (Khabib Nurmagomedov) याने नुकतीच सेवानिवृत्ती पत्करली. त्यानंतर त्याने आता आपल्या भावाला सल्ला दिला आहे. तो म्हणतो की, उमर (Umar Nurmagomedov) याने UFC मध्ये उतरुन कामगिरी करण्याची हीच ती वेळ आहे. Umar Nurmagomedov हा UFC 249 मध्ये हंटर अझूर (Hunter Azure) याच्याविरुद्धच्या सामन्यातून पदार्पण करणार होता. परंतू, COVID-19 मुळे घालण्यात आलेल्या निर्बंधांमुळे त्याला माघार घ्यावी लागली होती.

दरम्यान, पुन्हा एकदा तो UFC-ESPN 14 मध्ये उतरण्यास सज्ज झाला होता. परंतू, त्याचे वडील Abdulmanap Nurmagomedov यांचे निधन झाल्यामुळे त्याचे पदार्पण लांबणीवर पडले. दरम्यान, Umar हा UFC 254 मध्ये Khabib Nurmagomedov याच्यप्रमाणेच पदार्पण करण्याचा विचार करत होता. परंतू येथेही त्याचे नशीब आडवे आले. त्याचे पदार्पण होऊ शकले नाही. त्यामुळे आता Khabib Nurmagomedov याने पुन्हा एकदा उमर याला सल्ला दिला आहे. (हेही वाचा, Khabib Nurmagomedov Retirement: प्रख्यात UFC LightWeight फायटर खबीब नूरमागोमेदोव ने केली सेवानिवृत्तीची घोषणा, आईला दिलेल्या वचनाचे केले पालन)

एका रशीयन संकेतस्थळ TASS ने दिलेल्या वृत्तानसार उमर नूरमागोमेदोव याला ताप आणि उलट्यांचा त्रास होऊ लागल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. खबीब नूरमागोमेदोव यानेही सोशल मीडियाच्या माध्यमातून या वृत्ताची पुष्टी केली आहे.खबीब याने म्हटले होते की उमर याला आगोदरच काहीसा हलका ताप आणि संसर्ग होता. परंतू त्याच्या संघाला खात्री होती की तंदुरुस्थ तंदुरुस्त होऊन तो लवकरच परत येईल.परंतू अबूधाबी येथे जाण्यापूर्वीच त्याचे संक्रमण वाढले आणि त्याला अधिक त्रास सुरु झाला. सध्या त्याच्यावर दुबई येथील रुग्णालयात उपचार सुरु आहेत.