ब्राझीलची राजधानी रिओ दि जानेरो मधील वर्ल्ड कप रायफल / पिस्टल या टप्प्यातील वर्ल्ड कप रायफल / पिस्टल या टप्प्यातील वर्षाच्या चौथ्या आणि अंतिम सामन्यात भारताचा पहिला दिवस चांगला राहिला. भारतीय नेमबाज इलावेनिल वलारिवन (Elavenil Valarivan) हिने महिलांच्या 10 मीटर एअर रायफल स्पर्धा जिंकली आणि तिच्या पदार्पणातील ज्येष्ठ वर्षातील पहिले ज्येष्ठ विश्वचषक सुवर्ण पदक पटकावाले. पण, देशबांधव आणि विश्वविजेतेपद रौप्यपदक विजेती अंजुम मौदगिल नेही विश्वचषकमध्ये तिसऱ्यांदा अंतिम फेरी गाठली. पण, तिला पाचव्या स्थानावर सम्नाधान मानावे लागले. यासह तिने भारतासाठी अजून एक पदक मिळवण्याची संधी गमावली.
वलारिवनने अंतिम सामन्यात 251.7 च्या प्रयत्नातून भारताला नव्याने वर्चस्व वाढविण्यास राखण्यास सहाय्य केले. आणि 250.6 च्या प्रयत्नाने रौप्यपदक जिंकणाऱ्या ब्रिटनच्या सीओनाईड मॅकिंटोश हिला मागे टाकले. दरम्यान, चिनी तैपेईच्या यिंग-शिन लिनने दोन टोक्यो 2020 कोटा स्थानांसह कांस्यपदक जिंकले. तर दुसरा कोटा इराणने जिंकला. यावर्षी महिलांच्या 10 मीटर एअर रायफलमध्ये भारताने विश्वचषकमधील चारपैकी तीन सुवर्णपदक जिंकले आहेत.
The first Gold at the Rio de Janeiro World Cup goes to India https://t.co/nwrcu3CGNS pic.twitter.com/pTks3kNNp5
— ISSF (@ISSF_Shooting) August 28, 2019
जागतिक क्रमवारीत प्रथम क्रमांकाचा आणि अंतिम क्रमांकाचा जागतिक विक्रम धारक अपूर्वी चंदेला 62.7 गुणांसह 11 व्या स्थानावर राहिली. स्पर्धेतील किमान पात्रता गुण (एमक्यूएस) विभागात मेहूली घोष हिने 629.1 अशी शूटिंग केली होती, ज्यामुळे तिलाही अंतिम फेरीत स्थान मिळवले.