भारतीय महिला क्रिकेट संघाचा Asian Games 2023 च्या अंतिम फेरीत प्रवेश, बांग्लादेशचा नामुष्कीजनक पराभव,

Indian Women's Cricket Team News: भारतीय महिला क्रिकेट संघाने आशियाई क्रीडा स्पर्धा 2023 मध्ये (Asian Games 2023 ) अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. भारताचा हा प्रवेश म्हणजे पदार्पणातच पदक निश्चित मानले जात आहे. बांग्लादेशविरुद्ध (India vs bangladesh Asian Games 2023 Cricket) झालेल्या सामन्यात 8 विकेट्स राखून दणदणीत विजय मिळवत भारताने ही कामगिरी केली. ही कामगिरी करताना भारताकडून पूजा वस्त्राकर (Pooja Vastrakar) हिने घेतलेले 4 बळी महत्त्वपूर्ण ठरले. ज्यामुळे बांग्लादेशचा संघ अवघ्या 51 धावांमध्ये निपटला.

भारताकडून जेमिमाह रॉड्रिग्स (Jemimah Rodrigues) सर्वाधिक 20 धावा करणारी खेळाडू ठरली. स्पर्धेतील भारताची पहिली अर्धशतकवीर शफाली वर्माने (Shafali Verma) 17 धावा केल्या. भारतीय महिला संघाने उपांत्य फेरीत वर्चस्व राखले. बांगलादेशने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. परंतु हीच गोष्ट निगार सुलताना संघाच्या वाट्याला पराभव देणारी ठरली. भारतीय महिला गोलंदाजांची शिस्तबद्ध चेंडूफेक आणि बांग्लादेशी फलंदाजांकडून होणाऱ्या अत्यंत साध्या चुका आणि सुमार दर्जाची खेळी यामुळे त्यांचा संघ केवळ 51 धवांत गुंडाळला. नामुष्कीजनक असे की, बांग्लादेशच्या एकाही खेळाडूला धवांचा दुहेरी आकडा घाठता आला नाही. त्यांचे सर्व फलंदाज केवळ 0 ते 9 इतक्याच धावा करुन तंबुत परतले.

ट्विट

भारताची गोलंदाज पूजा वस्त्राकरने चार षटकांत चार विकेट्स घेतल्या. तिला Titas Sadhu, अमनजोत कौर आणि देविका वैद्य यांनीही चांगली साथ दिली. त्यांनी प्रत्येकी एक विकेट घेतल्याने. तुटपुंज्या धावसंख्येचा पाठलाग करताना जेमिमाह रॉड्रिग्ज आणि कनिका आहुजा यांनी दोन्ही सलामीवीर 40 धावांवर बाद झाल्यानंतर संघाला अंतिम फेरीत नेले. रॉड्रिग्ज आणि आहुजा दोघेही अनुक्रमे 20 आणि 1 धावांवर नाबाद राहिले.