IND vs PAK Davis Cup 2019 Match: भारताची ITF कडे मागणी, पाकिस्तान विरुद्ध डेविस कपसामना तटस्थ ठिकाणी व्हावा
(Photo Credit: ANI Photo)

अखिल भारतीय टेनिस असोसिएशनने (AITA) बुधवारी आंतरराष्ट्रीय टेनिस फेडरेशनला (ITF) इस्लामाबादमध्ये खेळवला जाणारा पाकिस्तान (Pakistan) विरुद्ध डेविस कप (Davis Cup) सामना एकतर पुढे ढकलण्यास सांगितले किंवा दोन्ही देशांमधील सामना तटस्थ ठिकाणी घेण्यात यावा अशी मागणी केली आहे. आयटीएफने म्हटल्याप्रमाणे आशिया ओशिनिया ग्रुपच्या सामन्यासाठी तटस्थ ठिकाणी जाण्याचा आग्रह धरला जाणार नाही, असे एआयटीएने म्हटले आहे. महेश भूपती (Mahesh Bhupati) याच्या नेतृत्वाखाली भारताचा टेनिस संघ 14-15 सप्टेंबर रोजी पाकिस्तानविरुद्ध इस्लामाबादमध्ये डेविस कप मॅच खेळणार आहे. आणि मागील अनेक दिवसांपासून याववद वाद सुरु आहे. भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या मतभेदामुळे आयटीएने आंतरराष्ट्रीय टेनिस महासंघाने पाकिस्तानमधील सुरक्षा परिस्थितीचा पुनर्विचार करण्याची मागणी केली आहे.

काश्मीरमधून घटनेचा कलम 370 हटवल्यानंतर दोन्ही देशांमधील संबंध पुन्हा कडू झाले आहेत आणि यामुळे भारतीय संघाचा 55 वर्षानंतरचा पाकिस्तान दौरा विवादामध्ये अडकला आहे. ऑल इंडिया टेनिस असोसिएशनचे (ITA) सरचिटणीस हिरणमय चटर्जी, आंतरराष्ट्रीय टेनिस फेडरेशनचे (ITF) कार्यकारी संचालक, जस्टिन अल्बर्ट यांना सुरक्षेचा पुनर्विचार करण्याबाबत पत्र लिहिले आहे.

दरम्यान, केंद्रीय क्रीडामंत्री किरेन रिजिजू यांनी सोमवारी सांगितले की, भारताचा हा दौरा द्विपक्षीय मालिका नसून डेव्हिस चषक स्पर्धेचे विश्वचषक सहभागी आहे, त्यामुळे टेनिसपटूंना पाकिस्तान दौर्‍यावर रोखू शकत नाही. भारताच्या डेव्हिस कप संघाने 1964 मध्ये शेवटी पाकिस्तानचा दौरा केला होता. मागील काही वर्षांपासून पाकिस्तान संघ आपला डेव्हिस चषक सामने तटस्थ ठिकाणी खेळत आहे.