भारतीय क्रिकेट संघातील ऑफस्पिनर आर आश्विन (R Ashwin) याने आंतरराष्ट्री क्रिकेट (International Cricket) आणि या खेळातील सर्व प्रकारांमधून निवृत्ती घेतली आहे. भारतीय कर्णधार रहित शर्मा (Rohit Sharma) याच्यासोबत ब्रिस्बेन (Gabba) मधील गब्बा (Brisbane) येथे आयोजित पत्रकार परिषदेत त्याने आज (18 डिसेंबर) हा निर्णय जाहीर केला. आपल्या क्रिकेट कारकीर्दीतील हा त्याचा शेवटचा दिवस होता. बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीची तिसरी कसोटी अनिर्णित राहिल्यानंतर अश्विनची घोषणा झाली. कर्णधार रोहित शर्मा याने आपल्या निवृत्तीची पुष्टी केली. तो म्हणाला की, आपण उर्वरित मालिकेसाठी संघाचा घटक असणार नाही. येत्या गुरुवारी म्हणजेच 19 डिसेंबर रोजी भारतात परतेल.
माझ्यात अजूनही खेळ बाकी
आर आश्विन याने पत्रकार परिषदेत सांगितले की, 'आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाच्या सर्व फॉरमॅटमध्ये भारतीय क्रिकेट म्हणून हा माझा शेवटचा दिवस असेल. मला असे वाटते की क्रिकेटपटूमध्ये माझ्यामध्ये आणखी थोडा खेळ बाकी आहे. जो मी क्लब-स्तरीय क्रिकेटमध्ये दाखवू इच्छितो. त्यामुळे हा माझा शेवटचा दिवस असेल, माझ्या मनात रोहित आणि माझ्या अनेक सहकाऱ्यांसोबतच्या खूप आठवणी आहेत. ज्या माझ्या मानत चिरंतन कायम असतील, असे अश्विनने पत्रकार परिषदेत सांगितले. (हेही वाचा, IND vs AUS: बॉर्डर-गावस्कर स्पर्धेत 'या' दोन गोलंदाजांमध्ये पाहायला मिळणार जबरदस्त लढत, अश्विनचा विक्रम धोक्यात)
ऑस्ट्रेलिया संघाचेही आभार
आर आश्विन याने पुढे म्हटले की, सहाजिकच मला अनेकांचे आभार मानायचे आहेत. पण अद्याप बीसीसीआय आणि बाकीच्या सहकाऱ्यांचे आभार मानले नाहीत. मी हे आभार मानले नाहीत तर मी माझ्या कर्तव्यात कसूर करतो आहे असे होईल. मला माझ्या सर्व प्रशिक्षकांची नावे सांगायची आहेत. रोहित, विराट, अजिंक्य आणि पुजारा ज्यांनी हे सर्व झेल स्लिपमध्ये घेतले आणि मला ते विकेट मिळवण्यात मदत केली. अश्विनने ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाचेही आभार मानले. तो म्हणाला की, गेल्या अनेक वर्षांमध्ये ते प्रतिस्पर्धी आहेत. ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाचेही खूप खूप आभार. ते खूप दमदार प्रतिस्पर्धी आहेत. मला त्यांच्यासोबत खेळण्याचा आनंद लुटता आला. क्रिकेटमधून निवृत्ती घेणे हा माझ्यासाठी अत्यंत भावनिक क्षण आहे.