Australia Men's National Cricket Team vs Indian National Cricket Team: ऑस्ट्रेलिया राष्ट्रीय क्रिकेट संघ विरुद्ध भारतीय राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यात पाच कसोटी सामन्याच्या मालिकेतील तिसरा कसोटी सामना ब्रिस्बेनमधील द गाबा येथे खेळवला जात आहे. आज खेळाचा पाचवा दिवस आहे. या सामन्यात टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाचा संघ तिसऱ्या दिवशी 117.1 षटकांत सर्वबाद 445 धावांवर आटोपला. त्यानंतर भारताचा पहिला डाव आज 260 धावांवर गारद झाला. त्यानंतर ऑस्ट्रेलियाने 89/7 वर दुसरा डाव घोषित करुन भारताला 275 धावांचे लक्ष्य दिले आहे. दरम्यान, गाबा कसोटीच्या शेवटच्या दिवशी खराब प्रकाशामुळे खेळ थांबवण्यात आला आहे. टी-ब्रेकही जाहीर करण्यात आला आहे. भारतासमोर 275 धावांचे लक्ष्य असून सध्या धावसंख्या 8/0 आहे.
After a little over two overs, bad light stops play at the Gabba ☔https://t.co/PupB4ooHCb #AUSvIND pic.twitter.com/15OvERvDNi
— ESPNcricinfo (@ESPNcricinfo) December 18, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)