Woman Slaps Boy | (Photo Credit- X)

ग्रेटर नोएडा येथील गौर सिटी 2 (Greater Noida's Gaur City 2) निवासी संकुलातील दोन मुलांमधील किरकोळ वादात एका महिलेने सहा वर्षांच्या मुलाला थप्पड (Child Abuse) मारल्याने तो गंभीर जखमी झाला. मुलाच्या गालावर जखमा झाल्या. पीडित मुलाच्या पालकांना याबाबत कळल्यानंतर त्यांनी पोलिसांमध्ये तक्रार (Police Complaint) दिली आहे. दरम्यान, पोलिसांनी प्राप्त तक्रारीवरुन गुन्हा दाखल केला आहे किंवा नाही याबाबत माहिती समजू शकली नाही. दरम्यान, या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल (Viral Videos) झाला आहे. दिल्लीतील गौर सिटी येथे नागरिक संकुलात राहणाऱ्या दोन मुलांमध्ये झालेल्या वादानंतर ही घटना घडली.

मुलाला कानाखाली जोरात चापट

प्राप्त माहितीनुसार, एकाच संकुलात राहणाऱ्या दोन मुलांमध्ये भांडण झाले. या भांडणात त्यांच्यापैकी एकाने त्याच्या आईला फोन केला. दोघांपैकी एकाची आई असलेल्या त्या महिलेने आपला संयम गमावून दुसऱ्या मुलाला कानाखाली जोरात चापट मारली. दरम्यान, लहान मुलांच्या भांडणात पालकांनी पडू नये आणि त्यात हिंसा तर मुळीच करु नये, असे म्हणत रहिवाशांनी हस्तक्षेप केला. परंतू, सदर महिला इतकी संतप्त झाली होती की, तिने या मुलाला पुन्हा फटके (मारहाण) देईन अशी धमकी दिली.

'एकटा दिसला की, बदडून काढेण'

व्हिडिओ पहिला: सदर घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये पाहायला मिळते की, एक महिला एका लहान मुलाला मारत आहे. दरम्यान, स्थानिक रहिवाशांनी हस्तक्षेप करताच ती त्यामुलाला धमकावताना दिसते. ती म्हणते आहे की, 'तू मला जेव्हा आणि जिथे एकटा दिसशील तेव्हा त्याला पुन्हा थप्पड मारेण.' दरम्यान, मुलाला मारहाण करणआऱ्या संतप्त महिलेने एका व्यक्तीवरही हात उचलण्याचा प्रयत्न केला. जो ही घटना आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद करत होता. या वेळी झालेल्या झटापटीत या व्यक्तीचा मोबाईल फोनही खाली पडला.

व्हिडिओ दुसरा: दरम्यान, याच घटनेचा आणखी एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये ही महिला मुलाची सोडवणूक करणाऱ्या स्थानिक रहिवाशांना शिवीगाळ करताना दिसत आहे. त्याच वेळी रहिवाशी मात्र प्रकरण निस्तारण्याचा प्रयत्न करताना पाहायाल मिळत आहे.

मुलाला मारहाण आणि संकुलातील रहिवाशांना शिवीगाळ केलेबद्दल पीडित मुलाच्या पालकांनी पोलिसांमध्ये औपचारिक तक्रार दिली आहे. या घटनेवर प्रतिक्रिया देताना स्थानिक पोलिसांनी सोशल मीडियावर निवेदन जारी केलेः "दोन मुलांमध्ये वाद झाला होता, ज्यामुळे त्यांच्या आयांमध्ये वाद झाला. तक्रार दाखल करण्यात आली असून आम्ही आरोपींची चौकशी करत आहोत. आवश्यक ती कारवाई केली जाईल ".

किरकोळ वाद, लगावली मुलाच्या कानशिलात

नागरिकांकडून संतप्त प्रतिक्रिया

घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच अनेक वापरकर्त्यांनी महिलेच्या कृत्याचा निषेध केला आहे. महिलेविरोधात कठोर कायदेशीर कारवाईची मागणी केली आहे. मुलांशी संबंधित भांडण-तंटा आणि वादविवाद सोडवण्यासाठी शांत आणि जबाबदार वर्तनाची आवश्यकता असल्याचे या नागरिकांनी म्हटले आहे. या प्रकरणाचा तपास सुरू आहे आणि पोलिसांनी आरोपींविरोधात योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे.