Sexual Assault Representational Image (Photo Credits: Pixabay)

Mumbai Shocker: अंधेरी परिसरात अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. एका 14 वर्षीय शाळकरी मुलीचे अश्लील फोटो तिच्या वर्गमित्राने लीक केल्याचे उघडकीस आले आहे. आरोपीने हे फोटो शाळा आणि खाजगी कोचिंग सेंटरमधील वर्गमित्रांमध्ये लीक केले. ज्यामुळे पीडितेचा मानसिक त्रासाला सामोरे जावे लागले. या प्रकरणी आंबोली पोलिसांनी (Amboli Police) अल्पवयीन मुलाविरुद्ध पोक्सो कायद्यान्वये (POCSO Act) गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे. फिर्यादी 42 वर्षीय महिला जोगेश्वरी येथे कुटुंबासह राहते. तिची मुलगी, अंधेरीच्या एका नामांकित शाळेत शिकणारी विद्यार्थिनी असून तिचे अल्पवयीन आरोपीसोबत मैत्रीपूर्ण संबंध होते. अल्पवयीन मुलगा 14 वर्षांचा आहे. त्यांच्या मैत्रीचे काही महिन्यांपूर्वी नातेसंबंधात रूपांतर झाले होते.

या दोघांमध्ये स्नॅपचॅटवर वारंवार संवाद होत असे. या मुलाने स्वत:चे अश्लील फोटो पाठवले आणि मुलीला असेच फोटो शेअर करायला सांगितले. त्याच्यावर विश्वास ठेवून तिने त्याचे ऐकले. त्यानंतर काही दिवसांनी त्यांच्यामध्ये वाद झाला आणि मुलीने त्यांचे नाते संपुष्टात आणले, ज्यामुळे मुलगा संतप्त झाला. त्याने कथितरित्या तिचे फोटो लीक करण्याची धमकी दिली आणि नंतर ते खाजगी कोचिंग क्लासेसमधील त्यांच्या वर्गमित्रांमध्ये आणि विद्यार्थ्यांमध्ये प्रसारित केले. तिचा चेहरा उघड न करणारे फोटो देखील सोशल मीडियावर व्हायरल केले गेले, ज्यामुळे मुलीच्या प्रतिष्ठेवर गंभीर परिणाम झाला. (हेही वाचा -Matunga Baby-Selling Racket: माटूंगा येथील अर्भक विक्री रॅकेटचा पर्दाफाश, मुख्य एजंटला अटक; मुंबई पोलिसांची कामगिरी)

दरम्यान, या सर्व प्रकारानंतर पीडितेने तिच्या आईला माहिती दिली. त्यानंतर पीडितेच्या आईने तत्काळ पोलिसांकडे धाव घेतली. आंबोली पोलिसांनी बीएनएस आणि पॉक्सो कायद्याच्या संबंधित कलमांतर्गत गुन्हा दाखल केला. तपास डीएन नगर पोलिसांकडे सोपवण्यात आला असून ते आरोपींची चौकशी करणार आहेत.  (हेही वाचा, Child Trafficking in Maharashtra: महाराष्ट्रात बाल तस्करीच्या मोठ्या प्रकरणाचा पर्दाफाश; 59 मुलांची सुटका, 5 जणांना अटक)

प्राप्त माहितीनुसार, ही धक्कादायक घटना 1 ऑगस्ट ते 16 डिसेंबर 2024 या कालावधीत घडल्याचे सांगण्यात येत आहे. हे फोटो इतरांसोबत शेअर करण्यात आले का? तसेच यात आणखी कोणाचा सहभाग होता? याचा तपास पोलिस करत आहेत.