![](https://mrst1.latestly.com/wp-content/uploads/2019/11/India-Men-and-Womens-Hockey-Team-380x214.jpg)
आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाने (FIH) शुक्रवारी येथे 2023 पुरूष हॉकी विश्वचषक (Men's Hockey World Cup) स्पर्धेचे आयोजन करण्यासाठी भारताची निवड केली आहे. भारताला सलग दुसऱ्यांदा या स्पर्धेचे यजमानपद देण्यात आले आहे. एफआयएचनुसार, पुरुष हॉकी विश्वचषक 13 ते 29 जानेवारी दरम्यान भारतात (India) खेळला जाईल.शुक्रवारी एफआयएचच्या वर्षाच्या अंतिम बैठक झाली आणि कार्यकारी मंडळाने हा निर्णय घेतला. या बैठकीत स्पेन (Spain) आणि नेदरलँड्स (Netherlands) 1 ते 22 जुलै दरम्यान होणाऱ्या 2022 महिला विश्वचषक स्पर्धेचे सोबत आयोजन करतील असाही निर्णय या बैठकीत घेण्यात आला आहे. पुरुष आणि महिला वर्ल्ड कप या दोन्ही ठिकाणांची घोषणा यजमान देशांकडून नंतर केली जाईल.
अशा प्रकारे चौथ्यांदा पुरुष हॉकी विश्वचषक स्पर्धेचे आयोजन करणारा भारत हा पहिला देश ठरला. यापूर्वी त्याने 1982 मध्ये मुंबई, 2010 मध्ये नवी दिल्ली आणि 2018 मध्ये भुवनेश्वर येथे ही स्पर्धा आयोजित केली होती. नेदरलँड्सने तीन पुरुष हॉकी विश्वचषकांचे आयोजन केले आहेत. 2023 मध्ये भारत स्वातंत्र्याची 75 वर्षे पूर्ण करेल, त्यामुळे या खेळाचा देशातील विकास दाखविण्यासाठी हॉकी इंडियाने विश्वचषक स्पर्धेचे आयोजन करण्याची इच्छा व्यक्त केली होती. भारत (बेल्जियम आणि मलेशिया, इतर दोन देश) याच्यासह तीन देशांनी पुरुषांच्या विश्वचषक स्पर्धेचे आयोजन करण्यासाठी दावेदारी दर्शवली होती. तर जर्मनी, स्पेन, नेदरलँड्स, मलेशिया आणि न्यूझीलंड या पाच देशांनी महिला विश्वचषक स्पर्धेसाठी बोली लावली होती. 2023 वर्ल्ड कपचे फॉर्मेट मागील टप्प्याप्रमाणेच राहील.
THIS JUST IN: After #HWC2018's resounding success, India win the hosting rights for the 2023 Hockey Men's World Cup, in 🇮🇳's 75th Independence year!
Read more: https://t.co/vemee37J8l#IndiaKaGame pic.twitter.com/ymjgxGwVmy
— Hockey India (@TheHockeyIndia) November 8, 2019
वर्ल्ड कपशिवाय, 2014 मधील एफआयएच चॅम्पियन्स ट्रॉफी, 2016 मधील कनिष्ठ पुरुष विश्वचषक, 2017 मधील एफआयएच हॉकी वर्ल्ड लीग फायनल, 2019 मधील एफआयएच पुरुष मालिका फायनल आणि अलीकडील एफआयएच हॉकी ऑलिम्पिक पात्रता समारोप यासह काही मोठ्या हॉकी स्पर्धांचे भारतात आयोजन करण्यात आले आहेत. घरच्या मैदानावर भारताला विश्वविजेतेपद मिळवण्याची संघाला सुवर्णसंधी असेल. भारतीय हॉकीने 1975 मध्ये अखेरचे जेतेपद जिंकले होते.