एचएस प्रणॉय आणि किदांबी श्रीकांत (Photo Credit: @BAI_Media/Twitter)

भारताचा आघाडीचा पुरुष एकेरी खेळाडू किदांबी श्रीकांत (Kidami Srikanth), साई प्रणीत (B Sai Praneeth) आणि एचएस प्रणॉय (HS Prannoy) यांनी सोमवारी स्वित्झर्लंडच्या बेसल शहरात सुरू झालेल्या बीडब्ल्यूएफ बॅडमिंटन वर्ल्ड चॅम्पियनशिपच्या दुसर्‍या फेरीत धडक मारली आहे. सातव्या मानांकित श्रीकांतने आयर्लंडच्या जागतिक क्रमवारीत 81 व्या क्रमांकाचा खेळाडू एनहाट एन्गुयेनचा 17-21, 21-16, 21-6 असा पराभव केला. श्रीकांतने हा सामना एक तास सहा मिनिटांत जिंकला. या विजयासह श्रीकांतने नुग्येनविरुद्ध आपल्या कारकिर्दीची नोंद 2-0 अशी विजयाची आघाडी मिळवली. पहिला गेम 17-21 ने गमावल्यानंतर दुसर्‍या गेममध्ये श्रीकांतने शानदार पुनरागमन केले. भारतीय खेळाडूने दुसरा गेम 21-16 असा जिंकून सामना रोमांचक बनविला आणि सामना तिसऱ्या गेमपर्यंत नेला. तिसर्‍या गेमच्या सुरुवातीपासूनच श्रीकांतने आपली आघाडी कायम राखली आणि एका वेळी त्याने 10-1 अशी आघाडी घेतली. आयर्लंडचा खेळाडूही यादरम्यान जखमी झाला आणि त्यामुळे त्याला वैद्यकीय उपचार घ्यावे लागले.

जेव्हा खेळ पुन्हा सुरू झाला तेव्हा श्रीकांत 12-2 ने पुढे होता. यानंतर, भारतीय खेळाडूने सलग गुण घेतले आणि तिसरा गेम 21-6 असा जिंकला आणि सामना जिंकला. दुसर्‍या फेरीत जागतिक क्रमवारीत दहाव्या क्रमांकावर असलेल्या श्रीकांतचा सामना जागतिक क्रमवारीत -44 इस्त्रायलीच्या मीशा जिल्बरमनशी होणार आहे. श्रीकांत दुखापतीतून सावरल्यानंतर पहिल्यांदा इतकं मोठं टूर्नामेंट खेळात आहे. दरम्यान, 16 व्या मानांकित खेळाडू प्रणीथने पहिल्या फेरीत कॅनडाच्या जेसन अँथनी सुईचा पराभव केला. प्रणितने 39 मिनिट चाललेल्या सामन्यात अँथनीचा 21-17, 21-16 असा पराभव केला. त्याचवेळी प्रणॉयने फिनलँडच्या इटु हियानोला तीन सामन्यांपर्यंत चाललेल्या सामन्यात पराभूत केले. प्रणॉयने हेयानाला 17-21, 21-10, 21-11 ने पराभूत केले. पुढच्या फेरीत प्रणॉयचा सामना चीनच्या लिन डॅन (Lin Dan) याच्याशी होईल. डॅनविरुद्ध प्रणॉयचा 2-2 असा विक्रम आहे.

महिला दुहेरीत मेघना जक्कमपुडी आणि एस. पूर्विशा राम जोडीने डायना कोर्लेटो सोटो आणि निकटे अ‍ॅलेजँड्रा सोटोमेयर जोडीचा 21-10, 21-18 असा पराभव केला. आज सर्वांचे लक्ष लागून असेल ते महिला एकेरीच्या सामन्याकडे. पी व्ही सिंधू (PV Sindhu) आणि सायना नेहवाल (Saina Nehwal) आज त्यांचा पहिला सामना खेळतील. अश्विनी पोनप्पा आणि एन सिक्की रेड्डी देखी; भारतीय दुहेरीच्या आपल्या मोहिमेला मंगळवारी सुरुवात करतील.