भारतीय हॉकी संघ ( फोटो सौजन्य- ट्विटर)

Hockey World Cup 2018 : भुवनेश्वर(Bhubaneswar) येथे 28 नोव्हेंबर पासून चालू झालेल्या हॉकी विश्वचषक स्पर्धेला (Hockey World Cup) सुरुवात झाली. तसेच बुधवारी भारतीय हॉकी संघाचा(Indian Hockey Team)  दक्षिण आफ्रिका (South Africa) संघाविरुद्ध हॉकीचा सामना (Hockey Match) पार पडला. या सामन्यामध्ये भारतीय संघाने 5-0 अशा फरकाने दक्षिण आफ्रिका संघाला नमवले आहे. त्यामुळे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi)  यांनी भारतीय संघाचे ट्विटरद्वारे कौतुक केले आहे.

भारतीय संघाने पहिल्या क्वार्टरटरमध्ये दोन गोल केले. तर 10 व्या मिनिटाला मनदीप सिंग आणि 12 व्या मिनिटाला आकाशदीप सिंगने दुसरा गोल करत आक्रमक खेळी केली. तर सिमरजीत सिंगने भारतीय संघाला सामना जिंकून देण्यासाठी मोलाचा वाटा उचलला. तसेच 'क' गटातील एका लढतीत बेल्जियमने(Belgium) कॅनडाला(Canada) 2-1 अशा फरकाने नमवले आहे.

या पहिल्या क्वार्टरमध्ये भारतीय हॉकी संघाने अर्ध्या वेळात 2-0 अशी खेळी केली. सिमरजीत सिंगने 43 आणि 46 व्या मिनिटाला तर 45 व्या मिनिटाला ललित उपाध्यायने गोल करुन दक्षिण आफ्रिकेच्या हॉकी संघाला 5-0 अशा फरकाने हरविले आहे. तसेच येत्या 2 डिसेंबर रोजी भारतीय संघापुढे बेल्जियमचे आव्हान असणार आहे.