अर्जेंटिना हॉकी संघ (फोटो सौजन्य- ट्विटर)

Bhubaneshwar: हॉकी विश्वचषक स्पर्धेला 28 नोव्हेंबर पासून भुवनेश्वर येथे सुरुवात झाली आहे. तर आज झालेल्या अर्जेंटिना (Argentina) विरुद्ध स्पेन (Spain)  या दोन संघामध्ये हॉकीचा सामना प्रेक्षकांना पाहायला मिळाला. मात्र या हॉकीच्या सामन्यामध्ये अर्जेंटिनाने स्पेन संघाला 4-3 ने हरविले असून या सामन्यामध्ये अर्जेंटिनाचा दणदणीत विजय झाला आहे.

अर्जेंटिना आणि स्पेन हे दोन्ही चिवट संघ आज हॉकी विश्वचषकासाठी(Hocky World Cup) खेळणार होते. या दोन्ही संघामध्ये चुरशीचा खेळ पाहायला मिळाला. तर 'A' गटातील पहिल्याच सामन्यात अर्जेंटिनाच्या संघाने स्पेन संघाला मागे टाकत 4-3 अशी खेळी केली. तसेच ऑगस्टीन मॅझील्लीला या खेळाडूला सामनावीराचा मान देण्यात आला. या सामना दरम्यान पहिल्या 15 मिनिटांत पाच गोल केले गेले. त्यानंतर अर्जेंटिनाच्या संघाने तीन तर स्पेन संघाने दोन केले. तसेच 3 मिनिटाला एन्रीक गोंझालेज जी कोस्टेजोन याने स्पेनला स्पर्धेत पुढे जाण्यास मदत केली. परंतु पुढच्या मिनिटाला ऑगस्टीन मॅझील्लीलाने गोल करत 1-1 अशी स्पेन संघासोबत बरोबरी साधली.पहिल्या सत्रामध्ये 14 व्या मिनिटाला पेरे रोमेऊने स्पेनला पुन्हा आघाडी मिळवून दिली. मात्र अर्जेंटिनाच्या संघाने नाराजगी व्यक्त न करत स्पेन संघाला 4-3 ने नमविले आहे.

तर शेवटच्या 10 मिनिटांत अर्जेंटिनाच्या संघाने स्पेन संघावर विजय मिळवत आनंद व्यक्त केला आहे. तसेच या दोन्ही संघाचा सामना थरारक झाल्याचे प्रेक्षकांनकडून व्यक्त केले जात आहे.