Hockey World Cup 2018 Anthem: 'जय हिंद इंडिया' गाण्याचा  प्रोमो, शाहरुख आणि ए आर रेहमान घेऊन आले नवं चॅलेंज !
शाहरुख खान ए आर रहमान (Photo Credits: Youtube)

Hockey World Cup 2018 Anthem:  27 नोव्हेंबरपासून सुरु होणाऱ्या हॉकी वर्ल्ड कप 2018 (Hockey World Cup 2018) च्या पार्श्वभूमीवर खास अँथम सॉन्ग बनवण्यात आलं आहे. नुकताच या गाण्याचा टीझर लॉन्च करण्यात आला आहे. 'जय हिन्द इंडिया' (Jai Hind India) असे या गाण्याचे बोल आहेत. या गाण्यासाठी पहिल्यांदा बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खान (Shahrukh Khan)  आणि संगीतकार ए आर रेहमान  (A.R.Rehman) एकत्र येणार आहे.

'जय हिन्द इंडिया' (Jai Hind India)  या अँथम सॉन्गचे दोन टीझर लॉन्च करण्यात आलेले आहेत. यामध्ये रेहमान आणि शाहरुख खान खास हुक स्टेप करताना दिसत आहेत. सोबतच त्यांनी चाहत्यांनाही हुक स्ट्रेप करण्याचं आवाहन केलं आहे. 27 नोव्हेंबरला अँथम सॉन्ग रिलीज केलं जाणार आहे. शाहरुख आणि ए आर रेहमान प्रमाणेच या गाण्यामध्ये नयनतारा, शिवमणि, नीती मोहन, श्वेता मोहन, साशा तिरुपति, श्वेता पंडित आणि हर्षदीप हे कलाकार झळकणार आहेत.

भारतात हॉकी वर्ल्ड कपला 27 नोव्हेंबर 2018 पासून रंगारंग कार्यक्रमाने सुरुवात होईल. रेहमान आणि शाहरुखच्या लाईव्ह परफॉर्मेंसची देखील चर्चा आहे. 28 नोव्हेंबर ते 16 डिसेंबर या दरम्यान ओडिसाच्या कलिंगा स्टेडिअमवर वर्ल्ड कपचे सामने रंगतील. यात जगातील 16 टीम्स सहभागी होणार आहेत.