द्युती चंदला अर्जुन पुरस्कार नाहीच, हरभजन सिंहचा 'खेल रत्न'चा अर्ज नकारला
द्युती चंद आणि हरभजन सिंह (Photo Credit: Harbhajan Singh/ Instagram)

भारतीय क्रीडा मंत्रालयाने खेल रत्न (Khel Ratna) व अर्जुन पुरस्कार (Arjuna Award) साठीच्या खेळाडूंच्या नावाची यादी तयार केली आहे. ती लवकरच केंद्रीय क्रीडा मंत्री किरण रिजिजू (Kiren Rijiju) यांच्याकडे पाठवण्यात येणार आहे. यात स्टार धावपटू द्युती चंद (Dutee Chand) हिचे नाव नाही नाकारण्यात आले आहे. त्यामुळे द्युतीला यंदाच्या पुरस्कारापासून वंचित रहावे लागणार आहे. आशियाई पदक विजेता धावपटू मनजीत सिंह (Manjeet Singh) यांचाही अर्जुन पुरस्कारासाठीचा अर्ज फेटाळण्यात आला आहे. दुसरीकडे, हरभजन सिंह (Harbhjan Singh) यांचा राजीव गांधी खेळ रत्न पुरस्कारासाठीचा अर्ज देखील फेटाळला आहे. खेळाशी निगडित संस्था पुरस्कारासाठी फक्त तीन नावं पाठवू शकते. त्यामुळे या द्युती आणि मनजीत यांचे अर्ज फेटाळण्यात आले आहे. (IND vs WI: वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी ODI मालिकेसाठी शुभमन गिल, अजिंक्य रहाणे यांना संघातून वगळल्याने सौरव गांगुली निराश; निवड समितीला दिला हा सल्ला)

दुसरीकडे, भारतीय क्रिकेट संस्था, बीसीसीआय (BCCI) ने गोलंदाज जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, अष्टपैलू रवींद्र जडेजा आणि महिला क्रिकेटपटू पूनम यादव यांच्या नावाची शिफारस अर्जुन पुरस्कारासाठी केली होती. पण यावर्षी बीसीसीआयकडून खेल रत्न पुरस्कारासाठी कोणत्याही खेळाडूची शिफारशी नाही करण्यात आली. पंजाब सरकारने हरभजनच्या नावाची शिफारस केली होती. पण, त्याच्या शिफारसीचा अर्ज 25 जूनला पाठवण्यात आला होता पण यासाठीचा अवधी 30 एप्रिल पर्यंत होती. दरम्यान, अॅथलेटिक्स फेडरेशन ऑफ इंडिया (एएफआय) ने द्युती आणि मनजीत यांच्या व्यतिरिक्त तेजिंदर पाल सिंह तूर, स्वप्ना बर्मन आणि अरपिंदर सिंह यांच्या नावाची शिफारस केली होती.

खेळाडूंच्या कामगिरीनुसार एएफआयकडून खेळाडूंची यादी तयार करण्यात आली होती. यात द्युती पाचव्या तर मनजीत चौथ्या क्रमांकावर होता. त्यामुळे पुरस्कारासाठी पहिल्या तीन खेळाडूची निवड करण्यात आली आहे. द्युतीने यंदा आपल्या खेळीने सर्वांची मनं जिंकली आहे. इटलीत नापोलीतल्या शंभर मीटर धावण्याच्या शर्यतीत द्युतीने सुवर्णपदक जिंकले. भारतीय महिला खेळाडूने या स्पर्धेत सुवर्णपदक जिंकण्याची ही पहिलीच वेळ.