पॅरीस ऑलिम्पिक 2024 (Paris Olympics 2024) ला सुरु झाली आणि गूगलने डूडल (Doodle) साकारत या स्पर्धेच आनंद साजरा करण्यास सुरुवात केली. दररोज नवनवी आणि भन्नाट डूडल सादर करताना प्रतिभा तर आहेच पण सोबत माहितीचा खजीनाही उपलब्ध होतो आहे. पॅरिस ऑलिंपिक गेम्समधील नौकायन गूगल डूडल (Google Doodle Sailing Paris Olympics 2024) आज (2 ऑगस्ट) सर्वांचे लक्ष वेधून घेते आहे. जे नवीनतम ॲनिमेटेड लोगोसह नौकानयनावर प्रकाश टाकत आहे. ते पॅरिस ऑलिम्पिक 2024 च्या सन्मानार्थ डूडल मालिकेचा एक भाग आहे. या आवृत्तीमध्ये आपणास एक ॲनिमेटेड पक्षी आणि कुत्रा पाहायला मिळतो. पक्षी बोटीमध्ये बसला आहे तर कुत्रा ती बोट खेचत किनाऱ्यावर आणतो आहे. असे लोभस दृश्य आजच्या डूडलमध्ये पाहायला मिळते.
पॅरिस ऑलिम्पिक 2024 सुरू झाल्यापासून, Google विशेष डूडलसह विविध क्रीडा स्पर्धांचा आनंद साजरा करत आहे. या आधीच्या डूडलमध्ये सर्फिंग, कलात्मक जिम्नॅस्टिक्स, फुटबॉल आणि असे बरेच काही पाहायला मिळालेआहे. तुम्हाला नवे डूडल पाहाययचे असेल तर तुम्ही Google मुख्यपृष्ठावर किंवा https://doodles.google/doodle/paris-games-sailing/ या संकेतस्थळावर क्लिक करु शकता.
गुगल डूडलद्वारे उदघाटन समारंभावर प्रकाश
पॅरिस ऑलिम्पिक 2024 च्या सुरुवातीला, Google ने समर गेम्सच्या उद्घाटन समारंभाचे प्रदर्शन करणारे GIF वैशिष्ट्यीकृत केले. गुगल डूडल्सच्या एका X पोस्टमध्ये म्हटले आहे, “आजचे Google Doodle पॅरिसमधील समर गेम्सच्या उद्घाटनाचा उत्सव साजरा करत आहे! तीव्र स्पर्धा आणि मजेदार डूडलच्या साप्ताहीक आनंदासाठी संपर्कात रहा!” (हेही वाचा, Surfing Olympics Google Doodle: सर्फिंग ऑलिम्पिक गूगल डूडल; पाण्यावर तरंगता पक्षी सांगतोय तरी काय?)
Google Doodle ची 2 ऑगस्टची आवृत्ती जगभरातील शंभराहून अधिक देशांमध्ये दिसत आहे. विशेषत: पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये सहभागी होणाऱ्या देशांमध्ये तिची उपस्थिती उल्लेखनीय आहे. (हेही वाचा, Swapnil Kusale Wins Bronze: पॅरिस ऑलिम्पिक गेम्स 2024 मध्ये स्वप्नील कुसळे याने कांस्य पदक जिंकले)
Google Doodle बद्दल
Google डूडल हे Google लोगोमध्ये एक सर्जनशील आणि उत्स्फूर्त प्रतिसाद आहे.जो विविध स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय विषय साजरे आणि सामायिक करतो. यामध्ये सुट्ट्या आणि वर्धापनदिनांपासून ते सांस्कृतिक प्रभाव पाडणाऱ्या प्रभावशाली व्यक्तींपर्यंत विविध गोष्टी असतात. डूडल स्थिर चित्रे, ॲनिमेशन, स्लाइडशो, व्हिडिओ आणि परस्परसंवादी गेमसह विविध स्वरूपांमध्ये पाहायला मिळते.
पॅरिस ऑलिम्पिक 2024
पॅरिस ऑलिम्पिक 2024 ची सुरुवात 26 जुलै रोजी एका भव्य उद्घाटनाने झाली. उद्घाटन समारंभात फ्रान्सची सांस्कृतिक विविधता, क्रांतिकारी आत्मा आणि वास्तुशिल्प वारसा यावर प्रकाश टाकण्यात आला. मुसळधार पाऊस असूनही, 205 देशांतील खेळाडू आणि एका निर्वासित संघाने 16 दिवसांच्या स्पर्धेच्या प्रारंभी 'परेड ऑफ नेशन्स' मध्ये सहभाग नोंदवला. फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी गेम्सचे उद्घाटन घोषित केले. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताने आतापर्यंत नेमबाजीत तीन कांस्यपदके जिंकली आहेत.