Conor McGregor (Photo Credits: Instagram)

UFC चॅम्पियनशीप स्पर्धेचा एक काळ गाजवणारा लोकप्रिय माजी चॅम्पियन कॉनर मॅकग्रेगोर (Conor McGregor) याने नुकतेच ट्विटरवर आपल्या जगभरातील चाहत्यांसाठी प्रश्नोत्तरांचे सेशन ठेवले होते. त्यात त्याच्या चाहत्यांनी त्याच्यावर प्रश्नांचा जणू भडिमारच केला. आपला आवडता चॅम्पियन कॉनरशी आपल्याला संवाद साधता येणार आहे हे कळताच चाहत्यांनी देखील ही आयती संधी सोडली नाही. यावेळी कॉनरने UFC मधून नुकतीच निवृत्ती जाहीर केलेल्या खबीब नुरमागोमेडोव विषयी ही बातचीत केली. त्याचबरोबर Nate Diaz, Tony Ferguson सह अन्य विषयांवर देखील चर्चा केली. यावेळी एका चाहत्याने त्याला त्याचा Whisky ब्रांड भारतात कधी आणणार याबाबत विचारले. त्यावर कॉनरने माझ्या ब्रँडसह मी देखील लवकरात लवकर भारतात भेट देणार असल्याचे सांगत त्यांनी भारतीय चाहत्यांना सुखद धक्का दिला.

नेमकं झाले असे की एका आयरिश चाहत्याने तुझा Whiskey Proper 12 हा भारतात कधी येणार याबाबत प्रश्न विचारला. त्यावर सध्या भारतात व्हिस्की बरीच लोकप्रिय होत आहे. भारतात गेल्या काही वर्षांपासून व्हिस्की दुप्पट वेगाने विकली जात आहे. त्यामुळे लवकरच मी माझा व्हिस्की ब्रँड भारतात घेऊन येईल आणि मी सुद्धा लवकरच भारत भेट देईन असे उत्तर कॉनर दिले. हेदेखील वाचा-Khabib Nurmagomedov Retirement: प्रख्यात UFC LightWeight फायटर खबीब नूरमागोमेदोव ने केली सेवानिवृत्तीची घोषणा, आईला दिलेल्या वचनाचे केले पालन

आयरिश मॅनने विचारलेल्या व्हिस्कीच्या प्रश्नावर उत्तर देताना शेवटी आपण देखील भारतात भेट देणार आहोत असे संकेत कॉनरने आपल्या भारतीय चाहत्यांना दिले आहेत.