(Photo Credits: Google Doodle)

फिफा विश्वचषक 2022 (FIFA World CUP) चा फिवर आता जगभरात वाढू लागला आहे. काऊंटडाऊन सुरु झाले आहे. कतार (Qatar) येथे या स्पर्धेचे आज उद्घाटन होईल. या उद्घाटन सोहळ्याकडे सर्वांचे लक्ष लागले असतानाच जगातील सर्वात मोठे सर्च इंजिन गूगलही (Google) या उत्साहात सहभागी झाले आहे. गूगलने खास डूडल (Fifa World Cup 2022 Google Doodle) बनवून या स्पर्धेचा उत्साह प्रतिबिंबीत केला आहे.

इंटरनेटवरील फिफा ज्वराबद्दल सांगायचे तर, जगातील सर्वात मोठे सर्च इंजिन अॅनिमेटेड डूडलसह ऐतिहासिक प्रसंगाचे स्मरण करत आहे. डूडलमध्ये दोन अॅनिमेटेड बूट फुटबॉलला लाथ मारताना दिसत आहेत. डूडलवर क्लिक करून चाहते वर्ल्ड कप कतार 2022 पेजवर प्रवेश करतात. ज्यात स्पर्धेबद्दल सर्व काही सर्व माहिती आहे. (हेही वाचा, FIFA World Cup, Qatar 2022, Opening Ceremony Live Streaming: फिफा विश्वचषक उद्घाटन सोहळा थेट प्रक्षेपण, लाइव्ह स्ट्रीमिंग कुठे आणि कसे पाहाल?)

फिफा विश्वचषक 2022 (FIFA World Cup 2022) स्पर्धेला कतारमध्ये आजपासून सुरुवात होत आहे. स्पर्धेच्या उद्घाटनाचा पहिलाच सामना यजमान कतार आणि इक्वाडोर यांच्यात रात्री 9:30 वाजता होईल. तर, स्पर्धेचा अंतिम सामना 18 डिसेंबर रोजी लुसेल स्टेडियमवर (Lusail Stadium) खेळवला जाईल. तत्पूर्वी अल बायत स्टेडियममध्ये आयोजित उद्घाटन समारंभ पार पडेल. स्टेडीयममध्ये या उद्घाटनास साधारण 60,000 लोक उपस्थित राहण्याची शक्यता आहे. स्टेडीयमची क्षमताही एकाच वेळी 60,000 लोक उपस्थित राहतील इतकी आहे. या उद्धाटन सोहळ्याचे आणि स्पर्धेतील सामन्यांचे थेट प्रक्षेपण अथवा लाईव्ह स्ट्रिमिंग आपण पाहू शकता.