FIFA World cup 2026 (Photo Credit - Twitter)

उत्तर अमेरिकेत (North USA) होणाऱ्या फिफा विश्वचषक 2026 च्या (FIFA World Cup 2026) प्लॅनमध्ये मोठा बदल करण्यात आला आहे. मंगळवारी जारी केलेल्या निवेदनात, फिफाने सांगितले आहे की पुढील विश्वचषक स्पर्धेत 4-4 संघांचे 12 गट असतील. तत्पूर्वी, 3-3 संघांचे 16 गट तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. फिफाने एका निवेदनात म्हटले आहे की, नवीन स्वरूप हे सुनिश्चित करते की प्रत्येक संघाला विश्वचषकात किमान तीन सामने खेळण्याची संधी आहे आणि हे सामने पुरेशा विश्रांतीसह आहेत. फिफा विश्वचषक 2026 मध्ये पहिल्यांदाच 48 संघ दिसणार आहेत. क्रीडा जगतातील या सर्वात मोठ्या स्पर्धेत आतापर्यंत केवळ 32 संघ सहभागी होत होते, ज्यांची 8 गटांमध्ये विभागणी करण्यात आली होती. प्रत्येक गटात चार संघ होते आणि गटातील अव्वल दोन संघ बाद फेरीत पोहोचले.

आता असा असेल फॉरमॅट

फिफाने सुरुवातीला अमेरिका, कॅनडा आणि मेक्सिको येथे होणाऱ्या 2026 विश्वचषक स्पर्धेसाठी 3-3 संघांचे गट तयार करण्याचा निर्णय घेतला होता, त्यापैकी प्रत्येक गटातील दोन संघ बाद फेरीत पोहोचायचे होते. रवांडाची राजधानी किगाली येथे मंगळवारी झालेल्या बैठकीनंतर प्रत्येक गटात 4-4 संघ ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. अशा परिस्थितीत अव्वल-2 संघांसह, सर्वोत्तम-8 तृतीय क्रमांकाचे संघ अंतिम-32 फेरीत पोहोचतील, तेथून बाद फेरीची सुरुवात होईल. (हे देखील वाचा: World 10 Richest Cricketers 2023: जगातील सर्वात श्रीमंत खेळाडू बनला आहे 'हा' क्रिकेटर, सचिन तेंडुलकर दुसऱ्या स्थानी; पहा संपूर्ण यादी)

नव्या फॉरमॅटनुसार आता फिफा वर्ल्ड कपमध्ये एकूण 104 सामने खेळवले जाणार आहेत. उपांत्य फेरी आणि अंतिम फेरीत पोहोचणारे संघ 8-8 सामने खेळतील. फिफा वर्ल्ड कपमध्ये आतापर्यंत 64 सामने खेळले गेले. 1998 पासून या स्पर्धेत 32 संघ सहभागी होत होते. 1998 पूर्वी फिफा विश्वचषक स्पर्धेत 24 संघ सहभागी होत असत.