Novak Djokovic (Photo Credits Facebook)

सध्याचा जगातील नंबर एकचा टेनिसपटू नोवाक जोकोविच (Novak Djokovic) हा पुढील आठवड्यापासून होणाऱ्या मियामी ओपन स्पर्धेला (Miami Open) मुकणार आहे. कोरोना लस (Corona Vaccine) न घेतल्यामुळे जोकोविचला अमेरिकेत प्रवेशबंदी आहे. यामुळे जोकोविच मियामी ओपन स्पर्धेत खेळू शकणार नसल्याची माहिती स्पर्धेच्या संचालकांनी दिली आहे. जोकोविच या स्पर्धेसाठी खेळाव यासाठी आयोजकांनी अनेक प्रयत्न केले, त्यांनी सरकारला देखील यासाठी विनंती केली होती. पंरतू सरकारने ही विनंती फेटाळली आहे. यामुळे नोवाक जोकोविच या स्पर्धेत दिसणार नाही. सध्या कॅलिफोर्नियात सुरू असलेल्या मास्टर्स स्पर्धेतही जोकोविच कोरोना लशीच्या मुद्द्यावरूनच खेळत नाही. (IPL Covid Rules: आयपीएल 2023 साठी कोविड-19 नियमावली जाहीर)

मियामी ओपन ही टेनिस क्षेत्रातील एक महत्त्वाची स्पर्धा आहे आणि सध्याचा जगातील नंबर एकचा टेनिसपटू नोवाक जोकोविचने तब्बल 6 वेळा या स्पर्धेचे विजेतेपद पटकावले आहे. यावेळी देखील या स्पर्धेच्या विजेतेपदासाठी जोकिविच हाच प्रबल दावेदार मानला जात होता. यासाठी या स्पर्धेच्या आयोजकांनी जोकोविच या स्पर्धेत खेळावा यासाठी प्रयत्न केले होते. परंतू 11 मे पासून अमेरिकेत असलेल्या कोरोनाच्या नियमावलीनूसार कोणत्याही व्यक्तीने जर कोरोना लस घेतली नसेल तर त्याला देशात प्रवेश करता येणार नाही, यामुळे जोकोविच या स्पर्धेला मुकला आहे.