ऑलिम्पिक पदक विजेता कुस्तीपटू सुशील कुमार (Wrestler Sushil Kumar) याला दिल्ली पोलिसांच्या (Delhi Police) विशेष पथकाने अटक केली आहे. यापूर्वी दिल्ली पोलिसांची एक टीम पंजाबमध्ये हजर आहे. मात्र अद्याप सुशील कुमार याला अटक करण्यात आलेली नाही. असे स्पष्टीकरण दिल्ली पोलिसांकडून देण्यात आले होते. दरम्यान, छत्रसाल स्टेडियमवर 23 वर्षीय सागर राणा याच्या हत्येसंदर्भात सुशील कुमार व इतरांविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आले आहे.
यापूर्वी सुशील कुमार आणि अजय यांना दिल्ली मधील मुंडका परिसरातून अटक करण्यात आल्याचे वृत्त समोर आले होते. पोलिस निरीक्षक शिवकुमार, निरीक्षक करंबीर यांच्या नेतृत्वात आणि एसीपी अत्तार सिंग यांच्या देखरेखीखाली असलेल्या विशेष सेल एसआरच्या पथकाने ही कारवाई केल्याचेही त्यात म्हटले होते. मात्र सुशील कुमारला अद्याप अटक झालेली नसल्याची माहिती दिल्ली पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली होती. अखेर त्याचा अटकेचा व्हिडिओ समोर आला आहे.
ANI Tweet:
#WATCH | A team of Delhi Police Special Cell arrested Wrestler Sushil Kumar; visuals from Saket Police Station.
(Source: Delhi Police) pic.twitter.com/tauURqxvC2
— ANI (@ANI) May 23, 2021
Wrestler Sushil Kumar has been arrested by a team of Special Cell, says Neeraj Thakur, Special CP-Special Cell pic.twitter.com/cIbyulgsbk
— ANI (@ANI) May 23, 2021
Delhi: Wrestler Sushil Kumar has been arrested by a team of Delhi Police Special Cell in Mundka area
(Pic source: Delhi Police) pic.twitter.com/plAfplKbix
— ANI (@ANI) May 23, 2021
सुशील कुमारने अटकपूर्व जामीनासाठी न्यायालयात धाव घेतली होती. मात्र न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळून लावला होता. तेव्हापासून सुशील कुमार फरार होता. दिल्ली पोलिस त्याचा आणि साथीदारांचा 5 मे पासून शोध घेत होते.
सागर राणा याच्या मृत्यूची बातमी कळल्यापासून सुशील कुमार फरार होता. याप्रकरणी सुशील कुमार विरोधात सीसीटीव्ही फुटेजही सापडले होते. या फुटेजमध्ये सुशील कुमार सागर आणि अन्य दोन व्यक्तींना हॉकी स्टिकने मारहाण करताना दिसत होता. विशेष म्हणजे हा व्हिडिओ खरा असल्याची पावती फॉरेन्सिक सायन्स लॅबने दिली होती.