दीपिका कुमारी (Photo Credits: Twitter)

टोकियो ऑलिम्पिकसाठी एशियन कॉन्टिनेंटल आर्चरी पात्रता स्पर्धेच्या रिकर्व्ह इव्हेंटमध्ये दीपिका कुमारी (Deepika Kumari) ने गोल्ड मेडल जिंकले. एकतर्फी फायनलमध्ये दीपिकाने देशबांधव अंकिता भकत (Ankita Bhakat) हिला 6-0 ने पराभूत केले आणि सुवर्ण पदक जिंकले. यापूर्वी या जोडीने सेमीफायनल फेरीत धडक मारून देशासाठी आणखी एक ऑलिम्पिक (Olympic) कोटा मिळविला होता. या महाद्वीपीय पात्रता फेरीत भारतीय तिरंदाजांनी उत्कृष्ट मानांकित दीपिका आणि सहाव्या मानांकित अंकिताने अंतिम चारमध्ये पोहचून ऑलिम्पिकमध्येवैयक्तिक स्थान पक्क केले. भूतानच्या कर्मा आणि व्हिएतनामच्या एंगुएट डो थी अनने उर्वरित दोन वैयक्तिक कोटा मिळविला आहे. आर्चरी असोसिएशन ऑफ इंडियावरील बंदीमुळे दीपिका, अंकिता आणि बॉम्बेला देवी लैश्राम हे भारतीय त्रिकुट तटस्थ ध्वजाखालील स्पर्धेत भाग घेत आहेत. (Asian Archery Championships: अभिषेक वर्मा-ज्योती सुरेखा यांच्या जोडीने जिंकले मिश्र कंपाऊंड स्पर्धेत सुवर्णपदक)

यापूर्वी, भारताची मिश्र दुहेरी जोडी अभिषेक वर्मा (Abhishek Verma) आणि ज्योती सुरेखा वेन्नम (Jyoti Surekha Vennam) या जोडीने कंपाऊंड मिश्र स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले आहे. पुरुष संघाने यापूर्वीच वर्ल्ड चॅम्पियनशिपमधून ऑलिम्पिक कोटा मिळविला आहे. यापूर्वी आशियाई तिरंदाजी स्पर्धेत दीपिकाने अतनु दासच्यासमवेत ऑलिम्पिकमध्ये मिश्र दुहेरीसाठी भारताचे स्थान निश्चित केले आहे. बँकॉकमध्ये झालेल्या आशियाई तिरंदाजी स्पर्धेत मिश्र दुहेरीच्या सामन्यात भारतीय जोडीने कांस्यपदकासह कोटा जिंकला. अतानू दास अतानू दास) आणि दीपिका कुमारीच्या जोडीने चीनच्या येचाई झेंग आणि शैजुवान वेईचा 6-2 असा पराभव केला होता.

दुसरीकडे, वर्षाच्या सुरूवातीस जागतिक स्पर्धेत तरुणदीप राय, अतनू दास आणि प्रवीण जाधव यांच्या पुरुष रिकर्व्ह संघाने कोर्टा जिंकला होता त्यामुळे, तिरंदाजीत हा भारताचा दुसरा ऑलिम्पिक कोटा आहे.