फुटबॉलपटू Cristiano Ronaldo च्या पुतळ्याजवळ विचित्र पद्धतीने काढले जातायत फोटो, सोशल मीडियावर हस्याचा वर्षाव
ख्रिस्तियानो रोनाल्डो (फोटो सौजन्य- ट्वीटर)

पोर्तुगालचा स्टार फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डो (Cristiano Ronaldo) चे चाहते जगभर पसरलेले आहेत. तसेच सोशल मीडियावरही रोनाल्डोच्या चाहत्यांची संख्या दिवसागणिक वाढत चालली आहे. मात्र पोर्तुगाल येथील एका म्युझियम मधील रोनाल्डोच्या पुतळ्याजवळ विचित्र पद्धतीने फोटो काढले जातायत. त्याचसोबत या विचित्र फोटो क्लिकमुळे सोशल मीडियावर हास्याचा वर्षाव होत आहे.

फुंचाल (Funchal) येथील म्युझियममध्ये रोनाल्डोचा कांस्य धातूने बनविलेला पुतळा उभारण्यात आला आहे. तसेच रोनाल्डोने गोल केल्यानंतरचा आनंद साजरा करण्याची स्टाईल या 11 फुट उंचीच्या पुतळ्यातून साकारण्यात आली आहे. या पद्धतीप्रमाणे दिसणारा पुतळा मडेरा येथील आंतरराष्ट्रीय विमानतळावरही उभारण्यात आला आहे. मात्र या पुतळ्याजवळ फोटो काढण्यासाठी येणाऱ्या लोकांना तो एका विचित्र कारणामुळे त्यांच्यावर छाप पाडत आहे. (हेही वाचा- इंस्टाग्रामवर फॉलोवर्सच्या यादीत फूटबॉलपटू क्रिस्तियानो रोनाल्डो अव्वलस्थानी)

 

View this post on Instagram

 

Met my mate Ronaldo 👍🏼 #maderia #ronaldo #ronaldostatue

A post shared by Hayley Gould (@h.gouldy_) on

 

View this post on Instagram

 

Someone's keen to meet the #ronaldostatue #goldenballs

A post shared by Marie (@riemaflee) on

रोनाल्डोचा उभारण्यात आलेला कांस्यचा पुतळ्याचा एक अवयव खूपच चमकदार करण्यात आला आहे. त्यामुळे येथे येणाऱ्या लोकांकडून रोनाल्डोच्या या अवयवाकडे जास्तच लक्ष वेधले जात असून फोटो काढण्यात येत आहे. तर हे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून हास्याचा वर्षाव केला जात आहे.