इंस्टाग्रामवर फॉलोवर्सच्या यादीत फूटबॉलपटू क्रिस्तियानो रोनाल्डो अव्वलस्थानी
क्रिस्तियानो रोनाल्डो (Photo Credits: File Image

पोर्तुगालचा स्टार फूटबॉलपटू क्रिस्तियानो रोनाल्डोचे चाहते जगभरात पसरले आहे. रोनाल्डोला फूटबॉलच्या मैदानाप्रमाणेच सोशल मीडियावरही चाहत्यांचे तुफान प्रेम मिळते. या प्रेमामुळेच इंस्टाग्रामवर अमेरिकन गायिका सेलेना गोमेजवर मात करत सर्वाधिक फॉलोवर्सच्या यादीत तो अव्वलस्थानी आला आहे. अमेरिकन साप्ताहिकाने दिलेल्या माहितीनुसार इंस्टाग्रामवर फॉलोवर्सच्या शर्यतीमध्ये रोनाल्डो सेलेनाच्या पुढे गेला आहे.

रोनाल्डोचे इंस्टाग्रामवर सध्या 144,338,650 फॉलोवर्स आहेत तर सेलेना गोमेजचे फॉलोवर्स 144,321,029 आहेत. सेलेना सोशल मीडियावर खूपच अ‍ॅक्टिव्ह असल्याने तिला चाहत्यांकडूनही भरूभरून प्रेम मिळते. मात्र आता रोनाल्डोने सेलेनावर मात केली आहे.

एकही लग्न न करता रोनाल्डो चार मुलांचा बाप आहे. तो त्याच्या गर्लफ्रेंडसोबत राहतो. मुलांसोबतचे खास व्हिडिओ, फोटोज तो सोशलमीडियावर शेअर करतो.

सेलेना गोमेज ही अमेरिकन गायिका आहे. 26 वर्षीय सेलेनावर काही महिन्यांपूर्वी किडनी प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया झाली. सेलेनाला तिच्या जवळच्या मैत्रिणीने किडनी दान केली होती. या शस्त्रक्रियेनंतर एका भावनिक पोस्टद्वारा तिचे आभारही मानण्यात आले होते. 22 सप्टेंबर रोजी शेअर करण्यात आलेल्या एका व्हिडिओ पोस्टला 1 कोटी 24 लाखाहून अधिक लोकांनी पाहिले होते.

काही दिवसांपूर्वी रोनाल्डोवर बलात्काराच्या प्रयत्नाचे आरोप करण्यात आले होते. मात्र पोर्तुगलचे राष्ट्राध्यक्ष त्याच्या मागे खंबीरपणे उभे होते.