Cristiano Ronaldo (Photo credit: Twitter)

फूटबॉल (Football) विश्वामध्ये एकीकडे फिफा वर्ल्ड कपची (FIFA World Cup 2022) धूम सुरू असताना या खेळातील बहुचर्चित खेळाडूंपैकी एक Cristiano Ronaldo बाबतची मोठी अपडेट समोर आली आहे. Cristiano Ronaldo भाग असलेल्या Manchester United सोबतचा करार त्यांनी सहमतीने मोडला असल्याचं जाहीर करण्यात आलं आहे. क्लब कडून त्याची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. तसेच क्रिस्टियानोने देखील यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. आता मॅन्चेस्टर युनायटेड मधून बाहेर पडलेला क्रिस्टियानो कुठल्या क्ल्ब सोबत खेळणार याची मात्र उत्सुकता आहे.

पोर्तुगालचा खेळाडू असलेला क्रिस्टियानो आपल्या देशाकडून मात्र गुरूवारी 24 नोव्हेंबर दिवशी फिफा फूटबॉल वर्ल्ड कप मध्ये पहिला सामना घाना विरूद्ध खेळणार आहे. कतार मध्ये सध्या फिफा फूटबॉलची धूम सुरू आहे.

दरम्यान मॅन्चेस्टर युनायटेड पासून वेगळं झाल्यानंतर त्याने सोशल मीडीयामध्ये आपली प्रतिक्रिया दिली आहे. 'मला मॅन्चेस्टर युनायटेड ने आणि फॅन्सने खूप प्रेम दिले. त्यांच्या भविष्यातील वाटचालीसाठी शुभेच्छा पण आता नवं आव्हान स्वीकारण्याची वेळ आली आहे असं म्हणत त्याने आपण मॅन्चेस्टर पासून वेगळं झाल्याचं म्हटलं आहे.

काही दिवसांपूर्वी क्रिस्टियानो याने एका मुलाखतीमध्ये क्लब बाबत केलेल्या खळबळजनक आरोपांनंतर त्याच्या हाकालपट्टीची शक्यता जाणवत होती. अखेर त्यांनी हा वेगळं होण्याचा निर्णय सहमतीने घेतल्याचं सांगत वाद कायमचा संपवला आहे. क्रिस्टियानो ने मॅनेजर एरिक टेन हॅगसह (Ten Hag) काही लोकं मला क्लब मध्ये पाहू इच्छित नसल्याचं म्हणत खळबळ माजवली होती.