COVID-19 विरोधात सानिया मिर्झाची पाकिस्तानला मदत; राफेल नडाल, रोजर फेडरर सोबत Stars Against Hunger चळवळीत दिले स्वाक्षरीकृत वस्तूंचे दान
रोजर फेडरर आणि राफेल नडाल, सानिया मिर्झा (Photo Credit: Getty)

भारताची स्टार टेनिसपटू सानिया मिर्झाने (Sania Mirza) जगातील अव्वल टेनिस स्टार्ससोबत कोरोना व्हायरसने (Coronavirus) पीडित असलेल्या लोकांना मदत करण्यासाठी पैसे गोळा करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. अल जजीराच्या वृत्तानुसार राफेल नडाल (Rafael Nadal), रोजर फेडरर (Roger Federer), नोवाक जोकोविच आणि नुकतीच निवृत्ती घेतलेली मारिया शारापोवासारखे टेनिस जगतातील प्रसिद्ध चेहऱ्यांनी पाकिस्तानच्या (Pakistan) मदतीसाठी पुढाकार घेतला आणि स्वाक्षरी असलेल्या वस्तू लिलावासाठी Stars Against Hunger या चळवळीत दान केल्या. नडाल आणि जोकोविचप्रमाणे फेडरर आणि सानिया कोविड-19 च्या संकट काळात लोकांना मदत करण्यासाठी शक्यतो प्रयत्न करत आहेत. सानियाने अलीकडेच भारतातील दैनंदिन वेतन कामगार, सिंगल मदर आणि विधवा यांच्या पोषणखर्चासाठी 1.25 कोटी रुपयांचा निधी उभारण्यात मदत केली होती तर फेडररने स्वित्झर्लंडमधील लोकांना मदत करण्यासाठी देणगी दिली. (सानिया मिर्झा बनली Fed Cup Heart पुरस्कार जिंकणारी पहिली भारतीय, बक्षीसाची रक्कम कोरोना लढाईत मुख्यमंत्री सहायता निधीला केली दान)

दरम्यान, हा उपक्रम मागील आठवड्यात पाकिस्तानचे सुप्रसिद्ध टेनिसपटू ऐसाम उल हक कुरैशी यांनी सुरू केला होता. तो पाकिस्तानमध्ये कोरोना व्हायरस लॉकडाउनमुळे प्रभावित झालेल्या गरीब कुटुंबांना घरो-घरी जाऊन रेशन देण्यासाठी निधी गोळा करत आहे. कुरेशीने आपल्या ट्विटमध्ये फेडरर आणि सानियासह टेनिस स्टार्सचे आभार मानले आहेत. रोजर फेडरर फाउंडेशन ने COVID-19 संकट काळात आफ्रिकेतील लहान मुलं आणि त्यांच्या कुटुंबियांना जेवण पुरवण्यासाठी 1 लाख डॉलर्सची देणगी देखील दिली होती.

दुसरीकडे, कुरेशी व्यतिरिक्त पाकिस्तान टीमचे माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीही लोकांना जीवनावश्यक वस्तूंचे वितरण करीत आहेत. आफ्रिदीने आजवर खैबर पख्तूनख्वा पख्तुनख्वा, सिंध, बलुचिस्तान आणि पाकिस्तान प्रशासित काश्मीरमधील 22,000 कुटुंबांना अन्नपुरवठा, जंतुनाशक साबण आणि इतर आवश्यक वस्तूंचे वाटप केले आहे. युवराज आणि हरभजन सिंहसह भारतीय क्रिकेटपटूंनी अलीकडेच केलेल्या भारतविरोधी टिप्पण्यांसाठी आफ्रिदीला फटकारले.