Asian Shooting Championship: चिंकी यादव हिने भारतासाठी 11 वे नेमबाजी पदक जिंकत मिळविला ऑलिम्पिक कोटा
प्रतीकात्मक फोटो 

चिंकी यादव (Chinki Yadav) हिने शानदार कामगिरी करत शुक्रवारी झालेल्या 14 व्या आशियाई स्पर्धेतील भारताचा दुसरा ऑलिम्पिक (Olympic) कोटा जिंकला. 25 मीटर पिस्तूल स्पर्धेत चमकदार कामगिरी करणाऱ्या 21 वर्षीय चिंकीने अंतिम सामन्यात रौप्यपदक जिंकले आणि पुढच्या वर्षी टोकियो (Tokyo) मध्ये आयोजित होणाऱ्या ऑलिम्पिकचे तिकीट मिळवले. ऑलिम्पिकचा कोटा जिंकणारा चिंकी ही 11 वी भारतीय नेमबाज ठरली आहे. तिने एकूण 296 गुण मिळवित अंतिम सामन्यात 588 गुणांसह दुसरे स्थान मिळविले. या स्पर्धेचे सुवर्णपदक थायलंडच्या नफास्वान यांगपेनऑन ने जिंकले. तिने एकूण 590 गुण मिळवले. या कार्यक्रमात राही सरनोबत (Rahi Sarnobat) हिने यापूर्वीच भारतासाठी पहिला कोटा मिळविला आहे. पुढील वर्षी ऑलिम्पिक जपानच्या टोकियोमध्ये होणार आहे.

या स्पर्धेत अन्य भारतीय अन्नूराज सिंग 575 आणि नीरज कौर 572 गुणांसह अनुक्रमे 21 आणि 27 व्या स्थानावर राहिले. मध्य प्रदेश नेमबाजी अकादमीची खेळाडू चिंकी यादवने आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये तीन सुवर्ण, दोन रौप्य आणि चार कांस्यपदक जिंकले आहेत. दीपक कुमार (Deepak Kumar) याने दोहा येथे सुरू असलेल्या आशियाई स्पर्धेत कांस्यपदक जिंकले आहे. या कामगिरीमुळे त्यानेही टोकियो ऑलिम्पिकचे तिकीट जिंकले. मनु भाकर (Manu Bhaker) हिनेही या चॅम्पियनशिपच्या 10 मीटर एअर पिस्तूल स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले आहे.