China Open 2019: चायना ओपनच्या दुसऱ्या फेरीत पीव्ही सिंधू ला झटका, पोर्नपावी चोचूवोंग कडून पराभूत
P. V Sindhu (Photo Credits: Hotstar)

भारतीय बॅडमिंटनची फुलराणी, पीव्ही सिंधू (PV Sindhu) ला गुरुवारी चायना ओपन वर्ल्ड टूर सुपर 1000 स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीत थायलंडच्या पॉर्नपावी चोचूवोंग याच्याकडून पराभव पत्करावा लागला. सिंधूला केवळ चोचुवोंग 21-12 13-21 21-19 पराभवाला सामोरे जावे लागले. सिंधू आणि चोचुवोंग यांच्यातील सामना 58 मिनिट चालला. तत्पूर्वी, पुरुषांच्या दुहेरी जोडी, सात्विकसाईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांच्या आव्हान देखील संपुष्टात आले. रंकीरेड्डी आणि शेट्टी यांना जपानच्या ताकेशी कमूरा आणि कीगो सोनोडा यांच्याविरुद्ध सरळ गेमच्या पराभव पत्करावा लागला. जगातील 15 व्या क्रमांकावर असलेले सात्विक आणि चिराग आपल्या चौथ्या मानांकित प्रतिस्पर्ध्यांविरुद्ध आपली चांगली सुरुवात कायम ठेवू शकले नाहीत आणि 33 मिनिटे चाललेल्या दुसर्‍या फेरीच्या सामन्यात 19-21, 8-21 ने पराभूत झाले.

तिसर्‍या आणि निर्णायक गेममध्ये सिंधू 12-7 आणि त्यानंतर 19-15 अशी आघाडीवर होती. पण थाई शटलरने सलग सहा गुण मिळवत उपांत्यपूर्व फेरी गाठण्यासाठी जोरदार पुनरागमन केले. सामन्यात सिंधूची आक्रमकता पूर्णपणे गायब होती. यापूर्वी सिंधूने तिच्या मागील सामन्यात चीनच्या ली झुएरूईचा 21-18, 21-12 असा पराभव केला होता. सिंधूने 34 मिनिटांत हा सामना सहज जिंकला होता. दुसरीकडे, सात्विक आणि अश्विनी पोनप्पा या मिश्र दुहेरी जोडी जपानच्या युकी कानेको आणि मिसकी मत्सुटोमो यांच्याकडून 11-21 21-16 12-21 ने पराभूत झाली. परुपल्ली कश्यप आणि बी साई प्रणीत नंतर आपापल्या एकेरीच्या दुसर्‍या फेरीच्या लढती खेळतील.

चायना ओपनच्या पहिल्या दिवशी लंडन ऑलिम्पिक कांस्य पदक विजेती सायना नेहवाल पराभूत झाली. दुखापतीतून सावरलेली 29 वर्षीय सायना पुन्हा फॉर्म मिळवण्यासाठी संघर्ष करत आहे. सायनाने इंडोनेशिया ओपनमध्ये विजयासह हंगामाची सुरूवात केली परंतु उर्वरित हंगामात बीडब्ल्यूएफ सर्किटमधील अन्य कोणत्याही स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश करता आला नाही. सायनाला जागतिक क्रमवारीत थायलंडच्या 19 व्या क्रमांकाच्या बुसानन ओंगबामरूंगपन (Busanan Ongbamrungphan) ने अवघ्या 44 मिनिटांच्या सामन्यात 10-21 17-21 ने पराभूत केले.