Tokyo Olympics 2020: भारताची आंतरराष्ट्रीय महिला तलवारबाज भवानी देवीने (Bhavani Devi) इतिहास रचला आहे. तिने यावर्षी 23 जुलैपासून सुरू होणार्या टोकियो ऑलिम्पिकसाठी क्वालिफाय केले आहे. तसेच भवानी ऑलिम्पिकमध्ये करणारी पहिली भारतीय तलवारबाज (Becomes First Indian Fencer To Qualify For Olympics) ठरली आहे. फेंसिंग असोसिएशन ऑफ इंडियाने याची पुष्टी केली आहे. चेन्नईच्या 27 वर्षीय भवानीने रविवारी बुडापेस्ट विश्वचषकात शानदार प्रदर्शन करून टोकियो ऑलिम्पिकमध्ये जागा मिळवली. बुडापेस्ट विश्वचषक ही ऑलिम्पिक क्वालिफायिंग स्पर्धा आहे. भवानीच्या कामगिरीमुळे संपूर्ण देशातून तिच्यावर कौतूकाचा वर्षाव केला जात आहे.
आशिया ओशनिया समूहामध्ये ऑलिम्पिकच्या दोन जागा होत्या. जपानच्या तलवारदाराला पहिली जागा मिळाली तर, दुसरी जागा भवानीला मिळाली, असे फेंसिंग असोसिएशन ऑफ इंडियाचे सरचिटणीस बशीर अहमद खान यांनी आयएएनएसला सांगितले आहे. हे देखील वाचा- IND vs ENG 2nd T20I 2021: विराट कोहलीचा तीन हजारी विक्रम! आंतरराष्ट्रीय टी-20 मध्ये 3000 धावा करणारा टीम इंडिया कर्णधार ठरला पहिला क्रिकेटर
एएनआयचे ट्वीट-
Bhavani Devi creates history by becoming the first Indian Fencer to qualify for the Olympics.
She trains under Mr. Nicola Zanotti in Italy and has been supported by the foundation since 2015. Along with the support of the State and National federation she has changed the script pic.twitter.com/8noEFOUOro
— GoSports Foundation (@GoSportsVoices) March 14, 2021
भवानी बुडापेस्टमध्ये होणाऱ्या विश्वचषक टूर्नामेन्टसाठी इटली येथे प्रक्षिक्षण घेत होती. ती 9 मार्चला बुडापेस्ट येथे पोहचली. कोरोनामुळे हंगरी येथील सीमा बंद होत्या. परंतु, कडक निर्बंध लावून ऍथलीट्सना प्रवास करण्याची परवानगी देणयात आली, असेही बशीर अहमद खान म्हणाले आहेत.