एश्ले बार्टी (Photo Credit: PTI)

ऑस्ट्रेलियन ओपन (Australian Open) 2022 च्या उपांत्य फेरीच्या सामन्याच्या एक दिवसापूर्वी ऑस्ट्रेलियाची स्टार टेनिसपटू एश्ले बार्टी (Ashleigh Barty) मेलबर्न पार्क (Melbourne Park) येथे तिचे क्रिकेट कौशल्य दाखवताना दिसली. बार्टी एक माजी क्रिकेटपटू असून यंदाचे ऑस्ट्रेलियन ओपनचे पहिले विजेतेपद जिंकण्यासाठी प्रयत्नशील आहे. बार्टीने तिची किट बॅग स्टंप म्हणून वापरली आणि मेलबर्न पार्कमध्ये तिच्या प्रशिक्षक संघाविरुद्ध फलंदाजी करताना दिसली.