Australian Open 2020: सानिया मिर्झा ने मिश्र-दुहेरीनंतर महिला दुहेरीच्या पहिल्या फेरीतून घेतली माघार
सानिया मिर्झा (Photo Credit: Getty)

भारतीय टेनिस स्टार सानिया मिर्झाची (Sania Mirza) ऑस्ट्रेलियन ओपन (Australian Open) मोहीम संपली. गुरुवारी सानिया आणि तिची महिला दुहेरीची युक्रेनची जोडीदार नादिया किचनोक (Nadiia Kichenok) बरोबर महिला दुहेरीच्या पहिल्या फेरीत खेळण्यासाठी गेली होती, परंतु सामन्याच्या मध्यभागी तिला पोटरीच्या दुखापतीमुळे माघार घ्यावी लागली. दुसर्‍या सेटमध्ये सानिया आणि नादिया 0-1 ने पिछाडीवर असताना त्यांना माघार घ्यावी लागली होती. सानिया आणि नादियाची चीनची जोडी झिनियुन हान आणि लिन झू जोडीविरुद्ध पहिला सामना खेळत होते. सानिया आणि नादियाने पहिला सेट 2-6 ने गमावला आणि दुसर्‍या सेटमध्ये पिछाडीवर पडली होती. सामन्यादरम्यान सानियाच्या पाय दुखापत झाली. या सामन्यापूर्वी सानियाने ऑस्ट्रेलियन ओपनच्या मिश्र दुहेरीतून माघार घेतली होती. पोटऱ्यांच्या दुखापतीमुळे सानियाने मिश्र दुहेरीतून आपले नाव मागे घेतले होते. मिश्र-दुहेरीत सानिया देशवासी रोहन बोपन्नाच्या जोडीने खेळणार होती. (Australian Open 2020: दिविज शरण यांची विजयी सलामी, पाब्लो कर्रेनो बुस्ता-जोआओ सोसा चा पराभव करत दुसऱ्या फेरीत केला प्रवेश)

सरावा दरम्यान सानियाच्या पायावर दुखापत झाली होती आणि जेव्हा ती खेळायला आली तेव्हा तिने पायाला पट्टी लावली होती. सानियाने 33 मिनिटांचा सामना खेळला, मात्र नंतर तिला माघारी घ्यावी लागली. यापूर्वी, सानियाने जवळपास 2 वर्षांच्या विश्रांतीनंतर टेनिस कोर्टात पुनरागमन केले आणि नादियासह होबार्ट आंतरराष्ट्रीय येथे महिला दुहेरीचे जेतेपद जिंकले होते. सानिया आई झाल्यानंतर दोन वर्ष टेनिसपासून दूर होती. पाकिस्तानी क्रिकेटपटू शोएब मलिकशी लग्न करणार्‍या सानियाने 2018 मध्ये इझान मिर्झा मलिकला जन्म दिला. इजहानला जन्म दिल्यानंतर सानियाची ही पहिली मोठी स्पर्धा होती.

याशिवाय, भारतीय भारताच्या दुहेरी स्टार दिविज शरणने बुधवारी ऑस्ट्रेलियन ओपनच्या पहिल्या फेरीत स्पेनचा पाब्लो कर्रेनो बुस्ता आणि पोर्तुगाल जोआओ सोसा च्या जोडीला पराभूत केले.शरण आणि सिटकने एक तास 28 मिनिटांत सरळ सेटमध्ये 6-4, 7-5 असे पराभूत करत दुसऱ्या फेरीत प्रवेश केला. दुसरीकडे, पुरुष एकेरीत प्रजनेश गुणेश्वरनच्या पहिल्या फेरीत पराभव झाल्यावर भारताचे एकेरीत आव्हान संपुष्टात आले आहे. पुरुषांच्या दुहेरीच्या सामन्यात अमेरिकेच्या बॉब ब्रायन आणि माईक ब्रायन या प्रतिष्टीत जोडीने बोपण्णा आणि जपानच्या यसुतक उचियमा या जोडीला 6-1, 3-6, 6-6 ने पराभवाला सामोरे जावे लागले आणि यासह पुरुष दुहेरीत भारताचे आव्हान संपुष्टात आले.