Australian Open 2020: दिविज शरण यांची विजयी सलामी, पाब्लो कर्रेनो बुस्ता-जोआओ सोसा चा पराभव करत दुसऱ्या फेरीत केला प्रवेश
दिविज शरण (Photo Credit: IANS)

न्यूझीलंडचा साथीदार आर्टेम सिटकच्या (Artem Sitak) साथीने भारतीय भारताच्या दुहेरी स्टार दिविज शरणने (Divij Sharan) बुधवारी ऑस्ट्रेलियन ओपन (Australian Open) 2020 च्या पहिल्या फेरीत स्पेनचा पाब्लो कर्रेनो बुस्ता (Pablo Carreno Busta) आणि पोर्तुगाल जोआओ सोसा (João Sousa) यांच्या जोडीला पराभूत केले. पहिल्या टप्प्यातील सामन्यात शरण आणि सिटकने एक तास 28 मिनिटांत सरळ सेटमध्ये 6-4, 7-5 असे पराभूत करत दुसऱ्या फेरीत प्रवेश केला. भारताच्या 53 व्या स्थानावरील शरण आणि सिटकने 69 टक्के पहिली सर्व्ह आणि 27 विनर्स मारून ऑस्ट्रेलियन ओपनच्या मोहिमेला जोरदार सुरुवात केली. दोहामधील कतार ओपनच्या पहिल्या फेरीत पराभवाला सामोरे जात शरणच्या नवीन सत्राची चांगली सुरुवात मिळाली नव्हती. ऑकलंडमधील एएसबी क्लासिकमध्ये दिविज आणि आर्टेमची जोडी उपांत्यपूर्व फेरी सैंडर गील आणि जोरान वीलगेनकडून पराभूत झाली. (Australian Open 2020: प्रजनेश गुणेश्वरन पहिल्या फेरीत गारद, एकेरीत भारताचे आव्हान संपुष्टात)

हंगामातील पहिल्या ग्रँड स्लॅमच्या दुसर्‍या फेरीत प्रवेश मिळाल्यावर शरण आणि सिटक पुढील फेरीत दहाव्या मानांकित मॅट पाविओ-ब्रूनो सोरेस आणि बेन मोलाचलान आणि बेन मोलाचलान आणि ल्यूक बॅमब्रिज यांच्यातील पहिल्या फेरीतील विजेत्या जोडीचा सामना करेल.

यापूर्वी झालेल्या पुरुष एकेरीच्या पहिल्या फेरीत लकी लुजर म्हणून पात्र झालेला प्रजनेश गुणेश्वरनने दुसर्‍या फेरीत नोवाक जोकोविचचा सामना करण्याची संधी गमावली. पहिल्या फेरीत त्याला जपानच्या तारो इटोकडून 4-6, 2-6, 5-7 ने पराभवाला सामोरे जावे लागले. हॉबर्टमध्ये अजिंक्यपद जिंकल्यानंतर तब्बल दोन वर्षानंतर ग्रँड स्लॅम खेळणारी सानिया मिर्झा युक्रेनच्या नाडिया किचेनोकबरोबर महिला दुहेरीत आज ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेत चीनी जोडी झिनियुन हान आणि लिन झूचा सामना करेल.