ऑस्ट्रेलियातील वृत्तपत्राने पुन्हा एकदा छापले सेरेनाचे 'वादग्रस्त' व्यंगचित्र
(Image Source: Twitter)

मेलबर्न: ऑस्ट्रेलियातील हेरॉल्ड सन या वृत्तपत्राने अंकाच्या पहिल्या पानावर टेनिसपटू सेरेना विल्यम हिचे वादग्रस्त व्यंगचित्र पुन्हा एकदा छापले आहे. या दैनिकाने यापूर्वी सोमवारीही सेरेनाचे व्यंगचित्र छापले होते. त्यावरूनही 'वंशवाद आणि लिंगभेदाचा' आरोप या दैनिकावर झाला होता. दरम्यान, या दैनिकाने पुन्हा एकाद वादग्रस्त व्यंगचित्र छापून नवा वाद निर्माण केला आहे.

मूळचे मेलबर्न येथील हेरॉल्ड सनचे व्यंगचित्रकार मार्क नाईट यांनी हे व्यंगचित्र सोमवारी काढले. ते अंकाच्या पहिल्या पानावर छापून आले. त्यानंतर या वृत्तपत्र आणि व्यंगचित्रावर जगभरातून टीका झाली. त्यानंतर या वृत्तपत्राने बुधवारी पुन्हा एकदा 'वेलकम टू पीसी वर्ल्ड' या मथळ्याखाली पहिल्या पानावर नवे व्यंगचित्र छापले. या दैनिकाने ऑस्ट्रेलिया आणि जगभरातील देशातील राजकीय व्यक्तिमत्वांचीही व्यंगचित्रे छापली आहेत.

या वृत्तपत्राने व्यंगचित्राचे समर्थन करताना म्हटले की, लोकांचे जर लोकांच्या पसंतीने आम्ही मजकूर छापू लागलो तर, जीवन अधिकच नीरस होऊन जाईल.