डोमिनिक थीम (Dominic Thiem) याने अॅटॅकिंग टेनिसचे प्रदर्शन करत नोवाक जोकोविच (Novak Djokovic) याच्यावर मात केली आणि एटीपी फायनलच्या (ATP Finals) अंतिम चारमध्ये स्थान निश्चित केले. आता जागतिक क्रमवारीत दुसऱ्या क्रमणकावरील जोकोविच अंतिम चारची पात्रता मिळवण्यासाठी रॉजर फेडरर (Roger Federer) याच्याविरुद्ध शूटआऊट सामना खेळेल. या स्पर्धेत जोकोविचविरूद्ध थिमच्या विजयाने सर्वांना चकित केले. लंडनच्या ओ 2 एरिना येथे आतापर्यंत झालेल्या स्टँडआऊट सामन्यात ऑस्ट्रियाच्या पाचव्या मानांकित थीमने जागतिक क्रमवारीत दुसर्या स्थानावर असलेल्या जोकोविचचा 6-7 (5/7), 6-3, 7-6 (7/5) असा प्रभाव केला. जोकोविच आणि थीमने एकमेकांना चांगली झुंज दिली, पण अखेरीस थीम जोकोविचच्या वरचढ राहिला आणि विजय मिळवला. आणि जोकोविचला वर्षाच्या अखेरच्या स्पर्धेत त्याचे आव्हान कायम ठेवण्यासाठी फेडररचा सामना करावा लागणार आहे. तत्पूर्वी, फेडररने राऊंड रॉबिन सामन्यात इटालियन प्रतिस्पर्धी मॅटिओ बेरेटिनी याचा 7-6 (7/2), 6-3 ने पराभव केला. (ATP Ranking मध्ये लिअँडर पेस याला मोठा धक्का, 19 वर्षात प्रथमच पहिल्या 100 मधून बाहेर)
फेडरर आणि जोकोविचमध्ये यंदाच्या विम्बल्डन (Wimbledon) फायनल सामन्याची पुनरावृत्ती गुरुवारी होईल. 16 वेळा ग्रँड स्लॅम विजेत्या जोकोविचने थीमला त्याचा सर्वोच्च टेनिस खेळण्यास भाग पाडले. जोमॅकोविचच्या 27 विनर्सच्या तुलनेत थीमने 50 विनर्स (Winners) ठोकले पण 44 अशक्त त्रुटी (Unforced Errors) नोंदवल्या. दोन्ही खेळाडूंमध्ये थरारक पहिला सेट रंगला. थीम विजयी होत असताना जोकोविचने टायब्रेकरमध्ये खेळ नेला. थीमने 5/7 असा पहिला सेट जिंकला, पण जोकोविचने दुसऱ्या सेटमध्ये पुनरागमन केले आणि 6-3 असा जिंकत बरोबरी साधली. तिसऱ्या आणि निर्णायक सेटमध्ये दोंघांमध्ये चांगली जुंपली, पण थीमने टायब्रेकमध्ये 7-6 (7/5) असा सामना जिंकला.
Well...was this the best match of the #ATPTour season?@ThiemDomi & @DjokerNole 👏#NittoATPFinals pic.twitter.com/8d3xwnCdbt
— ATP Tour (@atptour) November 12, 2019
दुसरीकडे, थर्ड सीड फेडररनेराईम रॉबिन ग्रुपमध्ये आपला सुरुवातीचा थीमविरुद्ध गमावला होता. दुसऱ्या सामन्यात बेरेटिनी (Matteo Berrettini) विरुद्ध फेडररला पहिल्या सेटमध्ये मेहनत करावी लागली. पहिला सेट टायब्रेक आरामात घेण्यासाठी 20 ग्रँड स्लॅम चॅम्पियनने आपल्या सर्वोच्च खेळ केला. याच्यानंतर फेडररने दुसरा सेट कोणत्याही अडचणीशिवाय प्रभावी खेळ करत 6-3 ने जिंकला. दरम्यान, यापूर्वी सोमवारी अव्वल मानांकित राफेल नडाल (Rafael Nadal) याचा आंद्रे अंगासी गटातील गतविजेत्या अलेक्झांडर झेवरेव्ह विरुद्ध सामन्यात पराभव झाला, तर स्टेफानोस त्सिटिपास याने डॅनिल मेदवेदेव याला पराभूत केले होते.