Hockey Legend Ashok Kumar Facing Financial Problems: मेजर ध्यान चंद यांच्या सुपुत्रावर मोठे आर्थिक संकट, 'या' गाण्याने व्यक्त केली वेदना (Watch Video)
अशोक कुमार (Photo Credits: Twitter)

Hockey Legend Ashok Kumar Facing Financial Problems: भारताचे माजी हॉकीपटू आणि दिग्गज हॉकीपटू मेजर ध्यानचंद (Major Dhyan Chand) यांचे पुत्र अशोक कुमार (Ashok Kumar) वडिलांविषयी वृत्तांत सांगण्यासाठी चर्चेत राहिले होते. प्रवेश जैन (Pravesh Jain) नावाच्या त्यांच्या मित्राने शूट केलेल्या एका नवीन व्हिडिओमध्ये अशोक कुमार ‘कहि दूर जब दिन ढल जाए’ गाणे गाताना दिसत आहेत. जैन यांनी कुमार यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आणि त्यांच्या आर्थिक संघर्षांविषयी ट्विटही केले. कुमार यांच्याकडे उत्पन्नाचे कोणतेही साधन नसल्याचेही ते म्हणाले. ट्वीटच्या मालिकेत कुमार यांना दोन वेळच्या जेवणांसाठीही संघर्ष करावा लागत असल्याचे त्यांनी म्हटले. एका ट्विटमध्ये जय यांनी 1936 ऑलिम्पिकमध्ये मेजर ध्यानचंद यांच्या अ‍ॅडॉल्फ हिटलरशी झालेल्या भेटीची एक कथाही सांगितली. ही घटना बर्‍यापैकी लोकप्रिय आहे कारण ध्यानचंदने हिटलरची जर्मन सैन्यात स्थान देण्याची ऑफर नाकारली होती. (Dhyan Chand Birthday Special: मेजर ध्यानचंद यांचा आज 115वा वाढदिवस, जाणून घ्या ऑलिम्पिक सुवर्णयुगाचे शिल्पकार असे बनले बनले 'हॉकीचे जादुगार')

व्हिडीओ शेअर करत असताना जैन यांनी कॅप्शनमध्ये लिहिले की, 'काल हॉकीचे महान दिग्गज आणि महान गायक अशोक कुमार माझ्या ऑफिसमध्ये आले होते. ते माझे चांगले मित्र आणि दिवंगत ध्यानचंद यांचे पुत्र आहेत. आपल्या काळातील जागतिक दर्जाचे हॉकीपटू अशोक कुमार यांच्याकडे जगण्यासाठी काही साधन नाही. सध्या त्यांच्याकडे कोणतेही पेन्शन आणि उत्पन्नाचे स्रोत नाही." नुकतेच ध्यानचंद यांच्या 115 व्या वाढदिवशी अशोक कुमार यांनी आपल्या वडिलांविषयी काही नवीन गोष्टी सांगितल्या होत्या. त्यावेळी अशोक म्हणाले, 'त्यांनी (ध्यानचंद) मला आणि माझ्या मोठ्या भावाला हॉकी खेळण्यापासून रोखले होते. आम्हाला नंतर समजले की यामागील कारण म्हणजे त्यांनी या गेममध्ये आर्थिक प्रोत्साहन न मिळाल्याबद्दलची चिंता होती."

दरम्यान, आपल्या वडिलांप्रमाणे कुमार देखील हॉकीचे एक दिग्गज आहेत. त्यांनी 1975 मध्ये पाकिस्तानविरुद्ध हॉकी विश्वचषकात विजयी गोल केला होता. मलेशियाची राजधानी क्वालालंपूर येथे हा सामना झाला होता. 1975 विश्वचषक विजेत्या हॉकी संघाचे प्रमुख सदस्य असलेले अशोक कुमार यांना नुकतेच मोहन बागान यांच्याकडून जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.