लक्ष्य सेन (Photo Credit: Instagram)

All England Open 2022: जागतिक चॅम्पियनशिप कांस्यपदक विजेत्या भारतीय स्टार लक्ष्य सेन (Lakshya Sen) याने गुरुवारी जागतिक क्रमवारीत तिसऱ्या क्रमांकावरील अँडर्स अँटोन्सेन (Anders Antonsen) याचा पराभव करून मोठा उलटफेर केला. ऑल इंग्लंड बॅडमिंटन चॅम्पियनशिपच्या (All England Badminton Champions) पुरुष एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत सेनने अँडर्सचा सरळ गेममध्ये पराभव करून उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली. या वर्षी जानेवारीमध्ये इंडिया ओपनचे विजेतेपद जिंकणाऱ्या आणि गेल्या आठवड्यात जर्मन ओपनचा उपविजेता ठरलेल्या अल्मोराच्या 20 वर्षीय शटलरने तिसऱ्या मानांकित अँटोनसेनवर 21-16, 21-18 असा विजय मिळवला. अँटोनसेन जागतिक चॅम्पियनशिपमध्ये दोन वेळा पदक विजेता आहे. सेन आणि अँटोनसेन आंतरराष्ट्रीय स्तरावर पहिल्यांदाच आमनेसामने आले होते.

लक्ष्य सेनने बर्मिंगहॅम येथे 16व्या फेरीच्या सामन्यात 55 मिनिटांत तिसऱ्या मानांकित अँडर्स अँटोनसेनचा 21-17, 21-18 असा पराभव केला. यापूर्वी फॉर्ममध्ये असलेल्या अँटोनसेनने पहिल्या फेरीत विद्यमान जगज्जेता सिंगापूरच्या लोह कीन यू याच्यावर मात केली होती. सुरुवातीचा गेम घेतल्यानंतर सेनला रक्तस्त्राव होत असल्याने त्याच्या बोटांवर टेप लावावा लागला. मात्र, त्याने खेळावर लक्ष केंद्रित केले आणि ब्रेकपर्यंत 11-7 अशी आघाडी घेतली. अँटोनसेनने 7 सरळ गुण घेतले परंतु भारतीय शटरने पुन्हा संयम राखला आणि विरोधी खेळाडूला दुसरा गेम घेऊ दिला नाही. नेट खेळ असो किंवा कोर्टच्या मागच्या बाजूने स्मॅश असो लक्ष्यने दोन वेळा जागतिक चॅम्पियन पदक विजेत्याला धूळ चारण्यासाठी आपला सर्वोत्तम खेळ केला. आता उपांत्यपूर्व फेरीत सेनचा सामना आठवे मानांकित हाँगकाँगच्या एनजी का लाँग अँगस किंवा चीनच्या लू गुआंग जू यांच्यापैकी एकाशी होईल.

दरम्यान, पीव्ही सिंधू दुसऱ्या फेरीच्या सुरुवातीलाच जपानच्या खालच्या मानांकित सायाका ताकाहाशी कडून 19-21, 21-16, 17-21 असा पराभव पत्करून सुपर 1000 स्पर्धेतून बाहेर पडली. याशिवाय माजी जागतिक नंबर वन सायनाला यामागुचीकडून 50 मिनिटे चाललेल्या सामन्यात 14-21, 21-17, 17-21 असा पराभव पत्करावा लागला आणि भारताची महिला एकेरी मोहीम लवकर संपली. पहिल्या गेममध्ये सायना फारसे काही करू शकलो नाही मात्र, लंडन ऑलिम्पिक कांस्यपदक विजेतीने तिसऱ्या गेममध्ये सामना खेचला. तिसर्‍या गेममध्ये सायना स्वस्तात बाद होईल असे वाटत होते. जपानी स्टारने 11-3 अशी आघाडी घेतली होती परंतु सायनाने 21-17 ने पिछाडीवर पडण्यापूर्वी आणखी 16 गुण जिंकले.