WWE SmackDown: 'डब्ल्यूडब्ल्यूई स्मैकडाउन' बाबत तुम्हाला या गोष्टी माहित आहेत का?
WWE SmackDown | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

'डब्ल्यूडब्ल्यूई स्मैकडाउन' (WWE SmackDown) बाबत अनेकांना आकर्षण असते. त्यापैकी अनेकांना 'डब्ल्यूडब्ल्यूई स्मैकडाउन' मधील स्टार्स, त्यांचे विक्रम, त्यांनी खेळलेले सामने असा इतिहासही तोंडपाट असतो. भारतात हा क्रीडा प्रकार फारसा लोकप्रिय नसल्याने अनेक मंडळी मात्र याबाबत अद्यापही अनभिज्ञ असतात. म्हणूनच आज आम्ही इथे 'डब्ल्यूडब्ल्यूई स्मैकडाउन' बाबत काही महत्त्वपूर्ण आणि ठळक अशी माहिती देत आहोत. 'डब्ल्यूडब्ल्यूई स्मैकडाउन' हा RAW, SMACKDOWN, NXT अशा तीन ब्रांडपैकी एक आहे. जो 'डब्ल्यूडब्ल्यूई' (WWE) द्वारा ऑपरेट केला जातो. वर्तमान स्थितीत स्मैकडाउन प्रत्येक शुक्रवारी प्रसारीत होतो. जो भारतात शनिवारी सकाळी दिसतो. पूर्वी एपिसोड US नेटवर्क वर येत असेलेला स्मैकडाउनचा एपीसोड आता FOX नेटवर्क वर येतो.

दरम्यान, स्मैकडाउन हा ब्लू ब्रांड नावानेही ओळखला जातो. टीव्हीवर स्मैकडाउन लाईव्ह पदार्पण 1999 मध्ये झाले होते. जर आपणास भारतात टीव्हीवर स्मैकडाउन पाहायचे असेल तर आपण शनिवारी सकाळी 6.30 वाजता TEN 1 आणि TEN 1 HD वर याचे थेट प्रसारण पाहू शकता. ज्या चाहत्यांना टीव्हीवर स्मैकडाऊन पाहता येत नाही अशी मंडळी WWE नेटवर्कवर जाऊन सब्सक्राईब करु शकतात. इथे आपण पूर्ण शो HD रुपात पाहू शकता. WWE नेटवर्क वर सब्सक्राइब सब्सक्राइब केल्यानंतर आपल्याला 1 महिन्यासाठी फ्री ट्रायलही मिळू शकते.

स्मकैडाउन लाइव प्रसारण टीव्हीवर पहिल्यांदा 29 एप्रील 1999 मध्ये सुरु झाले. सुरुवातीला हा शो टीव्हीवर गुरुवारी येत असे. आता 2005 पासून WWE ने हा शो गुरुवार ऐवजी शुक्रवारी सुरु केला आहे. 2005 ते 2015 पर्यंत हा शो प्रत्येक शुक्रवारी प्रसारीत केला जात असे. (हेही वाचा, US Presidential Election: अमेरिका राष्ट्राध्यक्ष पद निवडणुकीत 'द रॉक'ची एण्ट्री? 46% अमेरिकनांचा Dwayne Johnson यांना पाठिंबा)

WWE ने 2016 मध्ये पुन्हा एकदा स्मैकडाउन लाइव प्रसारणात बदल करत हा शो मंगळवारी प्रसारीत करण्यास सुरुवात केली. सध्यास्थितीत स्मैकडाउन लाइव हा WWE चा दुसऱ्या क्रमांकाचा ब्रांड ठरला आहे. स्मैकडाऊन लाईव्ह शोचे प्रसारण जवळपास 7 देशांमध्ये सुमारे 148 पेक्षाही अधिक शहरांमधून केले जाते.