आठ वर्षे, सहा महिने आणि 11 दिवसांच्या अश्वथ कौशिकने बुद्धिबळ ग्रँडमास्टरला पराभूत करणारा सर्वात तरुण खेळाडू बनून इतिहास रचला. सिंगापूरमध्ये राहणाऱ्या या तरुणाने स्वित्झर्लंडमधील बर्गडोर्फर स्टॅडथॉस ओपनच्या चौथ्या फेरीत पोलंडच्या 37 वर्षीय जेसेक स्टॉपाला पराभूत करून ही कामगिरी केली. मागील विक्रम गेल्या महिन्यात आठ वर्षांच्या लिओनिड इव्हानोविकने केला होता. जो ग्रँडमास्टरला हरवणारा नऊ वर्षाखालील पहिला खेळाडू बनला होता. पण अश्वथ सर्बियनपेक्षा पाच महिन्यांनी लहान असल्याचा दावा Chess.com ने केला आहे. (हेही वाचा - Asian Indoor Athletics Championship 2024: ज्योती याराजीने जिंकले सुवर्णपदक, महिलांच्या 60 मीटर अडथळा शर्यतीत रचला नवा राष्ट्रीय विक्रम)

पाहा पोस्ट -

“हे खरोखरच रोमांचक आणि आश्चर्यकारक वाटले, आणि मला माझ्या खेळाचा आणि मी कसा खेळलो याचा मला अभिमान वाटला, विशेषत: मी एका क्षणी वाईट खेळत होतो पण त्यातून परत येण्यात यशस्वी झालो,” कौशिकने स्टोपाला हरवल्यानंतर ही प्रतिक्रीया दिली आहे. 2015 मध्ये भारतात जन्मलेल्या, अश्वथने जगभरात अनेक युवा स्पर्धा जिंकून आधीच नाव कमावले आहे. विशेष म्हणजे 2022 मध्ये, Chess.com नुसार जागतिक अंडर-8 रॅपिड चॅम्पियन बनला होता.

अश्वथच्या वडिलांनी सांगितले की त्यांचा किंवा त्यांच्या पत्नीचा बुद्धिबळ खेळण्याशी काही संबध नाही आणि त्यांचा मुलगा, जो तो म्हणतो की, दररोज सात तास सराव करतो, तो इतका प्रतिभावान खेळाडू बनला हे पाहून त्यांना ही आश्चर्य वाटते. आपल्या परिवारात कोणीही या खेळात नसल्याचे त्यांनी सांगितले.